महाराष्ट्रातला काँग्रेसचा बडा नेता नाराज, ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं नाराजीचं कारण

"प्रश्न नाराजीचा नाही. पक्ष एखाद्या नेत्याला सांगतं की, या मतदारसंघातून तुम्हाला लढायचं आहे. दोन महिन्यांपूर्वी मला आदेश देण्यात आले होते आणि मी तसं काम करत होतो आणि अचानकपणे मला विश्वासात न घेता दुसरा उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. म्हणून नाराजीपण आहे", अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली.

महाराष्ट्रातला काँग्रेसचा बडा नेता नाराज, 'टीव्ही 9 मराठी'च्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं नाराजीचं कारण
काँग्रेस नेते नसीम खान
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 11:00 PM

काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक यादीचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. नसीम खान यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेस पक्षाची नेहमी भूमिका राहिलेली आहे की, प्रत्येक समाजाला न्याय देणे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. पूर्वी परंपरा अशी होती की एक किंवा दोन मुस्लिम समाजाचे उमेदवार देण्याची परंपरा होती. पण या वेळेस पहिल्यांदा असं झालं की अल्पसंख्यांक समाजाचा एकही उमेदवार देण्यात आलेला नाही, यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे की अल्पसंख्यांक समूहाचा एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. अनेकांचे मला फोन आले. अनेक जण भेटून देखील गेले. मी प्रचारासाठी अल्पसंख्यांक लोकांना उत्तर काय देऊ? माझ्याकडे देण्यासाठी उत्तर नाही म्हणून मी स्टार प्रचारकांमधून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या समाजाची भावना आणि नेत्यांच्या भावना काय आहेत, मी अखिल भारतीय काँग्रेसला कळवली आहे”, अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली.

“प्रश्न नाराजीचा नाही. पक्ष एखाद्या नेत्याला सांगतं की, या मतदारसंघातून तुम्हाला लढायचं आहे. दोन महिन्यांपूर्वी मला आदेश देण्यात आले होते आणि मी तसं काम करत होतो आणि अचानकपणे मला विश्वासात न घेता दुसरा उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. म्हणून नाराजीपण आहे. मला कोणाचा विरोध करायचा नाही. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची एक वेगळी विचारसरणी आहे. प्रत्येक जाती-जमाती, समाजाला न्याय देण्याची परंपरा झाली आहे. ती परंपरा का मोडण्यात आली आहे? मी प्रचारात गेल्यानंतर समाजाला कोणत्या तोंडाने उत्तर देऊ? ते कारण महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने एकही अल्पसंख्यांक उमेदवार न देण्याचे कारण काय? हे कारण मी सध्या शोधतोय. स्पष्ट सांगतोय की, मी नाराज आहे”, असं नसीम खान म्हणाले.

‘माझी नाराजी स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी’

“एकही अल्पसंख्यांक उमेदवार दिसला नसल्यामुळे माझी नाराजी आहे. महाराष्ट्र सोडून देखील मी इतर राज्यांमध्ये प्रचार केला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाला मदत करा. काँग्रेस पक्षाच्या सोबत राहा, असं निवेदन देत असतो. पण आता त्याच पक्षाने अल्पसंख्यांक उमेदवार दिलेला नाही. मग लोकांनी प्रश्न विचारल्यावर माझ्याकडे काही उत्तर नाही. माझी नाराजी स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी आहे. मी समाजाला काय उत्तर द्यायचं? माझ्याकडे शब्द नाहीत”, अशी भूमिका नसीम खान यांनी मांडली.

‘मी कुठेही प्रचार करणार नाही’

“प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे काँग्रेसने केलं आहे. प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे समाजाची अपेक्षा असते. महाराष्ट्र काँग्रेसने माझं नाव उमेदवारीसाठी सुचवलं होतं, अशी माझी माहिती आहे. कोण नेता आहे ज्याने मला आणि अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी मिळू नये म्हणून विरोध केला आहे. जो दिल्ली मधल्या कोणी विरोध केला आहे का? हे काय मी सांगू शकत नाही, पण यावर विश्लेषण केले पाहिजे, असे चुकीचे निर्णय होत असतील तर मग पक्षावर लोक विश्वास ठेवतील कसे? मी आता प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. मी कुठेही प्रचार करणार नाही”, असं नसीम खान यांनी सांगितलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.