धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, पण त्याला… पृथ्वीराज चव्हाण यांनी टोचले भाजपचे कान
महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीआधी मविआने आपली पकड पक्की करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे कान टोचले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांनीही सरकारला संदेश पाठवला आहे. कोणत्याही समाजाला गृहित धरू नका. चौकशी करणाऱ्या संस्थांनाही तोंड द्यावं लागलं. पूर्वी झालं नाही एवढं या काळात धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं. त्याला काही यश मिळालं नाही, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे कान टोचले आहेत.
महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीला निर्णायक बहुमत दिलं आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. यात ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केलं. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा भाजपव निशाणा
जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपली आहे. आम्ही निकालाची अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयात काय झालं हे जगाने पाहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला किती मतं मिळाली आणि किती लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं ही टक्केवारी बाहेर आली पाहिजे. मुंबई लुटली जात असेल तर मराठी माणूस त्यांना मतदान करणार नाही. अजुनही भाजपला वास्तवाची जाणीव आली नसेल तर निवडणुकांच्या निकालाच्या विस्तवांना सामोरं जावं लागेल, असंही ठाकरे म्हणाले.