फडणवीसांनी या गुन्ह्यातील सीडीआरची माहिती तपास यंत्रणांना का दिली नाही? सचिन सावंत यांचा सवाल

मनसुख हिरेनच्या गाडीसोबत ठाणे भाजपचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

फडणवीसांनी या गुन्ह्यातील सीडीआरची माहिती तपास यंत्रणांना का दिली नाही? सचिन सावंत यांचा सवाल
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 6:47 PM

मुंबई : “अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून 17 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असं म्हटलं जातं. या गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे (Congress leader Sachin Sawant criticize Devendra Fadnavis and BJP over Mansukh Hiren death case).

सीडीआर संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना न देता, सीडीआर कोणी दिला हे न सांगता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा घणाघाती आरोपही सावंत यांनी केला. फडणवीस यांनी या गुन्ह्यात सहभागी होऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

‘हिरेन मृत्यू प्रकरणात सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश’

सचिन सावंत म्हणाले, “हिरेन मृत्यू प्रकरणात सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश आहे. तो साध्य करण्यापायी भाजप नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत सुटले आहेत. यातून भाजप नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे. या प्रकरणातील सीडीआर आपल्याकडे आहे, असे फडणवीस यांनी विधीमंडळात जाहीर केले होते.”

‘फडणवीसांनी सीडीआर अद्यापही तपास यंत्रणांना दिला नाही’

“सीडीआर मिळवणे हा एक अपराध आहे आणि स्वतः वकील तसेच माजी गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना याची पूर्ण माहिती आहे. परंतु सदर सीडीआर अद्यापही त्यांनी तपास यंत्रणांना दिला नाही. हिरेन प्रकरणातील दोषी पकडण्यासाठी सदर माहितीचा उपयोग झाला असता. यातून दोषीला पाठीशी घालण्याचा त्यांचा उद्देश आहे का?”  असा सवालही सावंत यांनी विचारला.

सावंत म्हणाले, “कर्नाटक उच्च न्यायालयाने 15 मार्च 2021 रोजी अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालात न्यायालयाने म्हटलं की, एखाद्या आरोपीची वैयक्तिक माहिती त्यामध्ये सीडीआरही आला, न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कोणालाही अधिकाऱ्याने दिली, तर त्याला दोषी ठरवलं जाईल.”

‘फडणवीस अपराधी अधिकाऱ्यालाही ते पाठीशी घालत आहेत’

“फडणवीसांनी ती माहिती कोणी दिली हे न सांगितल्याने अशा अपराधी अधिकाऱ्यालाही ते पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गुन्ह्यामध्ये सहभागी होऊ नका,” अशी विनंती सचिन सावंत यांनी केली.

17 फेब्रवारीला मनसुख हिरेन ज्या मर्सिडीस गाडीतून फिरले ती गाडी एनआयएने जप्त केली आहे. या गाडीबरोबर ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो आहे. बेछूटपणे आरोप करणाऱ्या भाजपने या कनेक्शनबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली.

हेही वाचा :

Sachin Vaze Case : NIA प्रकरणात जप्त केलेली मर्सिडीज 4 मॅटिक कार मूळ धुळ्यातली!

VIDEO: त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर

वाझेप्रकरणी देशमुखांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा; प्रसाद लाड यांची जोरदार मागणी

व्हिडीओ पाहा :

Congress leader Sachin Sawant criticize Devendra Fadnavis and BJP over Mansukh Hiren death case

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.