Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ देवेंद्र फडणवीसांना वेगळा न्याय का; CDR ची माहिती तपास यंत्रणांना द्यावी’

सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. | Sachin Sawant

' देवेंद्र फडणवीसांना वेगळा न्याय का; CDR ची माहिती तपास यंत्रणांना द्यावी'
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:11 PM

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या जबाबदार पदावर काम केलेले आहेत. त्यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (Congress leader Sachin Sawant take a dig at Devendra Fadnavis)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचेकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसचीही भूमिका आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे, असे सावंत यांनी म्हटले.

‘सामान्यांना एक न्याय, फडणवीसांना न्याय दुसरा योग्य नाही’

काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणवीसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडील माहिती तपास यंत्रणांना देऊन सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे.

मोठा आवाज करुन आरडाओरडा करुन महत्वाचे प्रश्न दबले जात नाहीत. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये संविधान महत्वाचे असते. त्यात कायदे व्यवस्था, न्यायव्यवस्था सर्वांसाठी समान आहेत. कोणीही चौकशीच्या चौकटीत येतात. फडणवीसही त्याच चौकटीत बसतात त्यांनी या प्रकरणातील सर्व माहिती तपास यंत्रणांना देऊन जनतेसमोर योग्य आदर्श घालून दिला पाहिजे , असे सावंत म्हणाले.

सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय

ष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरु असणाऱ्या अंबानी स्फोटक प्रकरणात आता एक नवीन माहिती पुढे आली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित असलेले API सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी ते राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केल्याचा NIAला संशय आहे. यासंदर्भातील काही पत्रं ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहेत. (CCTV footage of sachin vaze saket society)

ही सर्व पत्रे साकेत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेख आहे. सोसायटीने मुंबई पोलिसांना एकूण दोन पत्रं लिहली आहेत. सचिन वाझे यांनी त्यांचे सहकारी रियाझ काझी यांच्यामार्फत साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

Param Bir Singh : मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या रेसमध्ये नवं नाव, अनिल देशमुखांसोबत तासभर चर्चा?

सचिन वाझेप्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई : अजित पवार

सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.