“जे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आलं त्या बद्दल का बोललं जातं नाही”; काँग्रेसने एकाच वाक्यात भाजपची राजनिती सांगितली
भाजपने लोकांना स्वप्न दाखवून आणि लोकांची दिशाभूल करून त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे. ज्या प्रकारची भाजपने स्वप्न दाखवली होती. त्याबाबत भाजप एका शब्दानही बोलत नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
मुंबईः सत्ताधीशांनी स्वतः पेक्षा जनतेची काळजी करावी कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून फक्त स्वतःचा फायदा न बघता नागरिकांचीही काळजी करावी असा टोला काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
त्यांना आता प्रत्यय आला की, त्यावेळी त्यांना जेलमध्ये टाकणार होते विरोधकांवर टीका करायची म्हणून ते वाटेल ती टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते की, मी बदला घेतला.
शिंदे गट आणि भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या काही नेत्यांच्या सुरक्षितेत कपात केली. मात्र हे चुकीचे असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्या्नी भाजपने कसे खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत आले त्याबद्दलही त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ज्या प्रकारची स्वप्न भाजपनी दाखवली आहेत, त्या बद्दल भाजप आणि त्यांचे काहीच का बोलत नाहीत असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपने लोकांना स्वप्न दाखवून आणि लोकांची दिशाभूल करून त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे. ज्या प्रकारची भाजपने स्वप्न दाखवली होती. त्याबाबत भाजप एका शब्दानही बोलत नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल टीका टिप्पणी केली जाते. त्यांच्याबद्दलही भाजप काही बोलत नाही. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून फडणवीस यांच्याकडून कोणावरही आरोप केले जात असतात अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.