“राज्यपाल भवन भाजप भवन झालं होतं”; काँग्रेसने भगतसिंह कोश्यारींची सगळी कुंडलीच मांडली
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून अनेकदा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केली गेली आहेत तयामुळेच त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करून त्यांना पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी विरोधकांनी जोरदारपणे केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवाविषयी सातत्याने राज्यपाल यांच्याकडून अवमान केला जात होता. त्यामुळेच त्यांना राज्यातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून केली जात होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्याविषयी मत व्यक्त केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी करून त्यांना राज्यातून पाठवून द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपच्या समर्थनाथ त्यांनी काम केल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, संविधानी व्यवस्थेला छेद देण्याच काम राज्यपाल करत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर बेताल वक्तव्य केली होती.
त्यांची ही वक्तव्य म्हणजे भाजपसाठी काम करत असल्याचे कृत्तीतून केली जात होती. त्यामुळेच राज्यपाल भवन भाजप भवन झालं होतं अशी बोचरी टीकाही पटोले यांनी केली आहे.
राज्यासाठी आणि देशासाठी ज्यांनी प्रचंड मोठं काम केले आहे. ते महापुरुष राज्याला नेहमीच आदर्श राहिले आहेत. आणि महाराष्ट्रातील विचारवंताना मोठे आदराचे स्थान आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून अनेकदा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केली गेली आहेत तयामुळेच त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करून त्यांना पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे.