दिल्लीप्रमाणेच मुंबईत भाजपची परिस्थिती होणार; काँग्रेस नेत्याने नरेंद्र मोदींवर साधला निशाणा…
नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त कोट्यवधीं रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र यातून येथील सामान्य जनतेला काय फायदा झाला असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये येऊन त्यांनी विकासकामांचे उद्घाटन केले आणि भाषणही केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशातील आणि राज्यातील कोणत्याही समस्यांबाबत एकही शब्द न बोलता त्यांनी टीका केली.
देशात आणि राज्यात महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारीचा प्रश्न वाढला असतानाही त्यांनी एकही शब्द त्याबद्दल बोलले नसून त्यावर त्यांनी मौन पाळले असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी मिशन मुंबई म्हणून भाजपनी नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आणले होते. मात्र ज्याप्रमाणे दिल्लीत भाजपची अवस्था झाली त्याच प्रमाणे मुंबईतही भाजपची अवस्था होईल अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
दिल्लीमध्येही ज्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची अवस्था आपने केली होती. त्याच प्रमाणे मुंबईतही भाजपची अवस्था होणार आहे.
दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला ज्याप्रमाणे तेथील नागरिकांनी नाकारले आहे. त्याच प्रमाणे मुंबईतील जनताही भाजपला नाकारणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त कोट्यवधीं रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र यातून येथील सामान्य जनतेला काय फायदा झाला असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुंबईमध्ये येऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंगे फुंकले असले तरी त्याचा फायदा भाजपला होणार नाही असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.