‘आम्हाला एकटंच लढू द्या, 2024 ला राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान व्हायला पाहिजे’
Congress | काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत. 2024 मध्ये राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा सूर काँग्रेसकडून पुन्हा एकदा आळवण्यात आला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘घरवापसी’ करणाऱ्या सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाई जगताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने (Congress) स्वतंत्रपणेच निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केले. (Congress should contest election independently says Bhai Jagtap and Prithviraj Chavan)
या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे मत बोलून दाखवले. तुम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती बघत आहात. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटले जाते. कोरोना काळात तुम्ही काँग्रेसचे काम पाहिले असेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, देखते है किसमे कितना है दम, असे भाई जगताप यांनी म्हटले. तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही 2024 मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा केला. काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत. 2024 मध्ये राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यामुळे मला तिकीट मिळालं नाही: सुनील देशमुख
काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या सुनील देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले. मी भाजपमध्ये गेलो पण तिथे माझं मन रमलं नाही. तालुक्यातील सर्व सहकारक्षेत्र माझ्याकडे असताना मला तिकीट नाकारण्यात आले. मी कोणाचं नाव घेत नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं पक्षात वर्चस्व असल्याने मला तिकीट मिळाले नाही, अशी टीका सुनील देशमुख यांनी केली.
भाजपचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आणला पाहिजे: अशोक चव्हाण
भाजपचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आणला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. राज्यात भाजपची सत्ता येईल, असे वाटल्यामुळे अनेकजण तिकडे गेले. पण आता या नेत्यांची भाजपमध्ये अडचण होत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल; संजय राऊत यांचं मोठं विधान
राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो, संजय राऊतांकडून शुभेच्छा
(Congress should contest election independently says Bhai Jagtap and Prithviraj Chavan)