देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसच प्रत्युत्तर; काँग्रेसनं आकडेवारीसह देशातील जागा सांगितल्या
बेरोजगारी, महागाई, छोट्या दुकानदारांना या ,सरकारने उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत जनतेने विश्वास दाखवल्यामुळे तो आनंद आम्ही द्विगुणित करू असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईः कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे विश्लेषण केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणुकीवरून काँग्रेसला छेडले होते. त्यांच्या या टिकेनंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी त्यांना काँग्रेस आणि देशातील काँग्रेसच्या जागांची सगळी त्यांना आकडेवारीच दिली आहे.
यावरून आता काँग्रेसने देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे की, भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल अशी वृत्ती असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला संपुष्टात आणण्याचं काम भाजप आणि राज्य सरकार करत आहे.
मात्र जो विचार संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत होते, त्याचं योग्य उत्तर कसब्याचे जनतेने या पोटनिवडणुकीत दिले आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गोष्टी राज्यात गंभीर बनल्या आहेत.
तरीही भाजपकडून या महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम सुरु होते. त्याच भाजपची मस्ती या कसब्याच्या निवडणुकीत उतरवलेली आहे असा जोरदार हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.
विधानसभेत कसबा पोटनिवडणुकीविषयी बाजू मांडत असताना त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नॉर्थ ईस्ट भारतात भाजपने बाजी मारली आहे.
मात्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची नीती एकच आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था त्यांची आहे. मात्र या देशात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस विजयी झाले आहे तसेच तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे तर त्रिपुरामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
त्या ठिकाणी पाच उमेदवार विजयी झाले आहे. तर नागालँडमध्ये एकही जागा काँग्रेसला मिळाली नव्हती. मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या दोन जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. त्यामुळे देशात आता एनडीएची घसरण चालू झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
बेरोजगारी, महागाई, छोट्या दुकानदारांना या ,सरकारने उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत जनतेने विश्वास दाखवल्यामुळे तो आनंद आम्ही द्विगुणित करू असंही त्यांनी यावेळी सांगितले.