अनिल देशमुख असेच मधात बोलले आता आत जात आहेत; मुनगंटीवारांच्या धमकीवरून सभागृहात गोंधळ

| Updated on: Jul 05, 2021 | 11:45 AM

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. (sudhir mungantiwar)

अनिल देशमुख असेच मधात बोलले आता आत जात आहेत; मुनगंटीवारांच्या धमकीवरून सभागृहात गोंधळ
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us on

मुंबई: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते. आता आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. (congress,ncp mla oppose sudhir mungantiwars statement in house)

सभागृह सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर 50ए अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार बोलत असतानाच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी मुनगंटीवार यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असंच मधात बोलले. आता आत जात आहेत. त्यामुळे मधात बोलू नका. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलत आहे. हा माझा अधिकार आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलण्याचं कारण नाही. सरकारची चमचेगिरी सुरू आहे, असं मुनंगटीवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी धारेवर धरलं

मुनगंटीवार यांच्या या विधानाला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी केलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे विधान कामकाजातून वगळण्यास सांगितलं. त्याला भास्कर जाधव यांनी विरोध केला. सुधीर मुनगंटीवार यांनी मला धमकी दिली आहे. हे कामकाजातून काढून टाकू नका. कामकाजात हे वाक्य ठेवा. ते काढून टाकू नका. मुनगंटीवार यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. ते रेकॉर्डवरच ठेवा. यांच्या राज्यात सध्या तेच चालू आहे. ईडी, सीबीआय, एसआयटी लावली जात आहे. त्यामुळे त्यांचं विधान रेकॉर्डवरून काढू नका, असं जाधव म्हणाले. तर एखादा आमदार सत्ताधाऱ्यांची बाजू घेत असेल तर त्याला चमचे आहेत का म्हणणं चुकीचं आहे. आमदाराला सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदारांना चमचे म्हणणाऱ्या समज देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केली. (congress,ncp mla oppose sudhir mungantiwars statement in house)

 

संबंधित बातम्या:

Monsoon Session Live Updates | सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं, प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते फडणवीस आक्रमक

ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचे धोरण; देवेंद्र फडणवीसांची टीका

सरकारला आदित्य, रोहित, पार्थच्या भविष्याची चिंता, गोरगरिब पोरांची नाही, आ. राम सातपुतेंचा हल्लाबोल

(congress,ncp mla oppose sudhir mungantiwars statement in house)