Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रेमडेसिव्हीर’चा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता जिल्हा स्तरावर कंट्रोल रुम, सरकारना महत्वाचा निर्णय

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता जिल्हा स्तरावरच कंट्रोल रुमची उभारणी केली जाणार आहे.

'रेमडेसिव्हीर'चा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता जिल्हा स्तरावर कंट्रोल रुम, सरकारना महत्वाचा निर्णय
Remdesivir injection
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 3:46 PM

मुंबई : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी राज्यात कोरोना लस, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता जिल्हा स्तरावरच कंट्रोल रुमची उभारणी केली जाणार आहे. (Control room at district level for remedisivir injection)

राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा काही मेडिकलवर कारवाईही करण्यात आलीय. पण आता ऑक्सिजन कंट्रोल रुममध्ये रेमडेसिव्हीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारीचं निवारण स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत केलं जाईल.

जिल्हा पातळीवर समिती

जिल्हा स्तरावर एक तांत्रिक समिती गठीत करुन त्यामार्फत विशिष्ट पद्धतीनं खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा उपयोग व्यवस्थित होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिव्हीरची गरज भासल्यास राज्य स्तरावरील FDAच्या कंट्रोल रुमशी संपर्क करुन कारवाई केली जाणार आहे. जिल्हा स्तरावर यासाठी कंट्रोल रुम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.

Remedisivir letter

रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत आरोग्य विभागाचं पत्रक

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न

राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन निर्मिती कंपन्यांशी नुकतीच बैठक घेतली. त्यात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक आणि काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील MRP कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आता ऑक्सिजन निर्मिती फक्त रुग्णांसाठी

राज्यात सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. पण त्यात आता लवकरच बदल केले जाणार आहे. आता 100 टक्के ऑक्सिजन हा फक्त वैद्यकीय वापरासाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलीय. ऑक्सिजनच्या निर्मितीला वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य राज्यातून ऑक्सिजन मिळवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहितीही शिंगणे यांनी दिलीय.

संबंधित बातम्या :

राज्यात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद, फक्त रुग्णांसाठीच ऑक्सिजन मिळणार

Maharashtra Corona Update : जम्बो कोविड सेंटर्स दत्तक घ्या, मुख्यमंत्र्यांचं खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांना आवाहन

Control room at district level for remedisivir injection

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.