मुंबई सेंट्रलमध्ये कोरोनाची लाट, एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ

मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत एकाच वेळी तब्बल 55 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे (Corona infection in Navjivan Society of Mumbai Central).

मुंबई सेंट्रलमध्ये कोरोनाची लाट, एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 11:20 AM

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबईला जेरीस आणल्याचं दिसत आहे. आता नव्याने मुंबई सेंट्रल येथे कोरोनाची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत एकाच वेळी तब्बल 55 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली (Corona infection in Navjivan Society of Mumbai Central). हा संसर्ग सोसायटीली अनेक लोकांपर्यंत पोहचला असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाने नवजीवन सोसायटीतील अनेकांचे स्वॅब नमुने घेतले असून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीचे अहवाल आल्यानंतरच नेमका किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे कळणार आहे. प्रशासनाने पूर्ण सोसायटी सील केली आहे. तसेच अनेकांना त्यांच्या घरातच होम क्वारंटाईन केलंय.

मुंबई सेंट्रलची नवजीवन सोसायटी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. मागील दिड महिन्यात येथे 55 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण इमारतच सील करण्यात आली. मुंबईमधील कोरोना विषाणूने पुन्हा इमारतींमध्ये प्रवेश केला आहे. तीन पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेल्या इमारती पूर्ण सिल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात डी विभागातील मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीपासून झाली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या इमारतीत गेल्या दिड महिन्यात 55 रुग्ण आढळून आले आहेत. याच इमारतीत नव्याने पुन्हा 5 रुग्ण आढळून आल्याने ही इमारत सील करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत सध्या अंधेरी ते दहिसर, भांडूप, मुलुंड, ग्रॅंटरोड या विभागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतील हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. या विभागात विशेष करुन इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सर्वाधिक झाला आहे.

इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याने पालिकेने तीन रुग्णाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला. डी वॉर्डत आतापर्यंत 3,903 रुग्ण आढळले. यापैकी 2,845 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर 162 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखाच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 6 हजारांच्या जवळ पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यात मुंबई सेंट्रलमधील एकाच सोसायटीत 70 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्याने काळजी वाढली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे (Maharashtra Corona Update). विशेष म्हणजे दोन दिवसात 19 हजार 510 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचला आहे. राज्यात 23 जुलै रोजी 9 हजार 895 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 24 जुलै रोजी 9 हजार 615 नवे कोरोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे 22 जुलै रोजी सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 278 रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात 278 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.68 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 13 हजार 132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 43 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.99 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 19 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, बाधितांचा आकडा साडेतीन लाखांच्या पार

पगाराबाबत मारामारी, कोरोना संकट, आरोग्याचा धोका, 50 वयोगटातील कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्तीची मागणी मान्य : अनिल परब

घड्याळावरुन लोकेशन ट्रॅकिंग, सकाळी 6 वाजता धडक, 9 कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका

Corona infection in Navjivan Society of Mumbai Central

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.