दहिसर येथे माहेरी 1 महिना मुक्काम, भिवंडीत परतलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग

भिवंडी शहरात आज (24 एप्रिल) 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे (Corona infection to Mother and childrens).

दहिसर येथे माहेरी 1 महिना मुक्काम, भिवंडीत परतलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 8:32 PM

ठाणे : कोरोना विषाणूचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील संसर्ग वाढतानाच दिसतो आहे. भिवंडी शहरात आज (24 एप्रिल) 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे (Corona infection to Mother and childrens). दहिसर येथील माहेरी राहून भिवंडीला आलेल्या महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संबंधित महिला 1 महिना माहेर थांबल्यानंतर 15 एप्रिल रोजी भिवंडी तांडेल मोहल्ला येथील आपल्या घरी परतली होती. ही माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाला मिळताच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले. या कोरोना चाचणीत 30 वर्षीय महिलेसह , 12 वर्षीय मुलगा आणि 2 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.

संबंधित कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. निकटच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील 7 जणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या व्यतिरिक्त वडाळ्यातील एका 7 वर्षीय मुलीला देखील कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही मुलगी आपल्या आईसोबत भिवंडीला आली होती. संबंधित महिला आपल्या तीन मुलांना घेऊन 19 एप्रिल रोजी भिवंडीतील गुलजार नगर येथील माहेरी आली होती. त्यावेळी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आणि कोरोना चाचणी केली गेली. यानंतर यातील 7 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील 2 जणांना देखील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आता भिवंडी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे वडाळा येथील रुग्ण मुंबईमध्ये मोजले जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

भिवंडी कोरोना अपडेट :

भिवंडी शहर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 10 भिवंडी तालुका कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 8 इंदिरा गांधी स्मृती कोव्हिड 19 रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या – 10 सारीचे रुग्ण – 5

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी ही माहिती दिली.

संबंधित बातम्या :

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

बुलेट ट्रेन रोखा, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणं अमानवीय : राहुल गांधी

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

Marathwada Corona Update | लढवय्या मराठवाडा कोरोनाचा मुकाबला कसा करतोय?

Pune Corona | 74 हॉस्टेल्स, 300 शाळा सज्ज, पुण्यात कोरोना लढ्यासाठी प्रशासनाची काय काय तयारी?

Corona infection to Mother and childrens

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.