97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज

मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका 97 वर्षीय आजींचा 27 मे रोजी कोरोनाचा अहवाल (Corona 97 Age Patient Discharge) पॉझिटिव्ह आला.

97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 7:11 PM

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत (Corona 97 Age Patient Discharge) आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नुकतंच मुंबईतील प्रिन्स अली खान रुग्णालयातून 97 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसात योग्य तो उपचार घेतल्याने त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर सुखरुप घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका 97 वर्षीय आजींचा 27 मे रोजी कोरोनाचा अहवाल (Corona 97 Age Patient Discharge) पॉझिटिव्ह आला. त्यांना लक्षणही दिसत होती. त्यांच्यासोबत त्यांच्या सातही जणांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या उपचारासाठी या आजी प्रिन्स अली खान या रुग्णालयात दाखल झाल्या.

त्यांचे वय जास्त होते. तसेच वयोमानानुसार त्यांना कमी ऐकू येत होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालय प्रशासनाला उपचार करण्यास अनेक अडचणी आल्या. पण त्या आजींच्या जिद्दीपुढे सर्व अडचणींनी लोटांगण घातले.

केवळ सात दिवसातच त्या आजींनी कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीरित्या पार करत कोरोनावर मात केली. यानंतर या आजींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना सुखरुप घरी सोडण्यात आलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 44 हजार 931 वर

राज्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईत काल दिवसभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 1 हजार 439 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील बाधितांची संख्या 44 हजार 931 वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभरात आज 48 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना बळींची संख्या 1465 वर पोहोचली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे, ठाणे, औरंगाबाद, सोलापूर अशा विविधा भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

संबंधित बातम्या : 

जळगावात कोरोनाचा कहर, आणखी 36 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

नागपुरात दोघा ‘सारी’ग्रस्त रुग्णांचा ‘कोरोना’ने मृत्यू

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.