मुंबई : कोरोनाच्या संकटात अनेक लहानग्यांच्या डोक्यावर छत्र हरपलं. अनेक मुलं अनाथ झाली. या मुलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी सरकारकडून कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी एखादी योजना सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे राज्य सरकारकडून 5 लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येणार आहे. या मुलांना ही मदत 21 व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून अनाथ झालेल्या मुलांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत. (5 lakh financial assistance to children orphaned by Corona)
राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्या कोरोनामुळे 5 हजार 172 मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला गमावलं आहे. तर 162 मुलांचे आई आणि वडिल अशा दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मुलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. या ही मुलं 21 वर्षांची झाल्यावर त्यांना व्याजासह ही रक्कम मिळेल. त्यामुळे शिक्षण आणि उद्योग-व्यवसायासाठी या मुलांना थोडी आर्थिक मदत मिळेल.
महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी महिला व बालविकास विभागाकडून एक योजना ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावावर 5 लाख रुपये मुदत ठेव योजना सुरु करता येईल का, ज्याद्वारे या बालकांना त्या रमकेवरील व्याज मिळत राहील, असा एक प्रस्ताव असल्याचं ठाकूर म्हणाल्या. त्याचबरोबर कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करुन दरमहा 2 हजार 500 रुपये मदत मिळेल, असाही एक प्रस्ताव असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. या दोन्ही प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती ठाकूर यांनी त्यावेळी दिली होती.
.@AdvYashomatiINC pic.twitter.com/H1kDAPJmrt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 2, 2021
दरम्यान, कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा त्यापैकी एकाला गमावलं आहे. त्यामुळे अनेक मुलं अनाथ झाले आहेत. अशा मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्समधून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
त्याशिवाय या मुलांना मोफत शिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज दिलं जाईल. त्यासाठीचं व्याज पीएम केअर्स फंडातून दिलं जाईल. या अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत आयुषमान भारत योजने अंतर्गत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही दिला जाणार आहे. त्यासाठीचं प्रीमियम पीएम केअरमधूनच भरलं जाणार आहे.
Maharashtra cabinet: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना अर्थसहाय्य, उद्योग निरीक्षक गट क भरती MPSCच्या कक्षेत, ठाकरे सरकारचा मोठा निर्णयhttps://t.co/AduRMFcPV9#UddhavThackeray | #Maharasthra | #Corona | #HSCexam
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये: सुप्रिया सुळे
Video: वेल डन! फडणवीसांचा एक निर्णय, जो प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीनं कम्पलसरी राबवावा!
5 lakh financial assistance to children orphaned by Corona