Corona | मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 5 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 38 वर

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पाचने वाढ झाली. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी तिघे मुंबईतील आहेत, एक नवी मुंबईतील आहे, तर एक यवतमाळ येथील आहे.

Corona | मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 5 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 38 वर
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 1:14 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona Patients Increased) संख्येत वाढ झाली. आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधितांची (Corona Patients Increased) संख्या 33 वरुन 38 वर गेली आहे.

या चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी तिघे मुंबईतील आहेत, एक नवी मुंबईतील आहे, तर एक यवतमाळ येथील आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 8 वर पोहोचली आहे. तर नवी मुंबईत आतापर्यंत तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर यवतमाळमध्येही आतापर्यंत तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.

“या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पण, आकडा वाढला आहे. हे सर्व रुग्ण कुटुंबातील किंवा जवळच्या संबंधातील आहेत. हाय रिस्कमधील आहेत. या चार कोरोनाबाधितांपैकी दोन जण हे एकाच कुटुंबातील आहेत. तर दोघे हे परदेशातून प्रवास करुन आले आहेत”, असंही राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा : ‘कोरोना’विषयी अफवा पसरवणं अंगलट, पुण्यानंतर बीडमध्ये दोघांवर गुन्हा

“पनवेलमध्ये 33 जणांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. जे नागरिक परदेश दौरा करुन आले आहेत, त्यांच्यात जर कोरोना संबंधित काही लक्षणं आढळली तर त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात येतं. पनवेलमध्येही या 33 जणांना याच कारणामुळे वेगळं ठेवण्यात आलं असून ते सर्व जण तिथेच आहेत”, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

“राज्यात बऱ्यापैकी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, चांगल्या रिझल्टसाठी आणखी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मी आरोग्य विभागाची बैठक घेतली, तेव्हा सर्वांचंच असं म्हणणं आहे की, फक्त शहरी भागातील शाळा-कॉलेज बंद न करता ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजही बंद करावेत. (Corona Patients Increased) परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या. प्रवासातील गर्दी कशी कमी होईल या दृष्टीकोनातून लक्ष देणे गरजेच आहे”, असंही राजेश टोपे म्हणाले.

“तसेच, खाजगी कंपन्यासुद्धा बंद करण्यात याव्या, अशा अनेक चर्चा या बैठकीत झाल्या. आवश्यक बाबी उपलब्ध आहेत का? याबाबत आढावाही घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या बैठकीत झालेली चर्चा मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सहमती असल्यास त्याबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाईल”, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 16
  • मुंबई – 8
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • नवी मुंबई – 3
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • एकूण – 38 कोरोनाबाधित रुग्ण

Corona Patients Increased

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ

Corona Update Live: देशातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या 110 वर

Corona | ‘कोरोना’शी लढण्यासाठी महापालिका सज्ज, मुंबई-पुण्यात घरोघरी सर्वेक्षण

Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.