Mumbai Corona update | मुंबईला कोरोनाचा विळखा, 823 नवे रुग्ण; चेंबूरमधील 4 इमारती सील

चेंबूरमधील चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. आगामी 14 दिवसांसाठी या इमारती सील असतील. (Corona patient Mumbai Chembur)

Mumbai Corona update | मुंबईला कोरोनाचा विळखा, 823 नवे रुग्ण; चेंबूरमधील 4 इमारती सील
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:27 AM

मुंबई : राजधानी मुंबईत कोरोनाचा (Mumbai Corona patient) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पालिका प्रशासनाने येथे मिशन झिरो सुरु केले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. शुक्रवारी शहरात तब्बल 823 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच चेंबूरमधील (Chembur ) चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. आगामी 14 दिवसांसाठी या इमारती सील असतील. (Corona patients increased IN Mumbai, 4 building of Chembur sealed)

चेंबूरमध्ये 4 इमारती सील

बऱ्याच महिण्यांच्या विश्रांतीनंतर राज्यात कोरोनाने (Maharashtra corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत शुक्रवारी (19 फेब्रुवारी) कोरोनाचे नवे 823 रुग्ण आढळले असून चेंबूरमधील चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आगामी 14 दिवसांसाठी या इमारती बंद असतील. तसच या काळात इमारतीतील नागरिकांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

धारावीमध्ये कोव्हिड चाचण्यांचे प्रमाण वाढवले

एकीकडे मुंबईतील 4 वॉर्ड कोव्हिड हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असताना मुंबईत सुरुवातीला कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी (Dharavi0, माहीम (Mahim) येथेही प्रशासनानं नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नियंत्रणात आलेल्या धारावीत कोरोनानं पुन्हा हातपाय पसरु नये, या करिता प्रशासन दक्ष झालं आहे. दादर, धारावी, माहीम क्षेत्रातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक, तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग आणि कोव्हिडसदृश लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात येते. माहीममध्ये रुग्ण संख्या वाढल्या पालिकेने टेस्टिंग वाढवल्या आहेत.

इतर बातम्या :

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह 

दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला 

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 6 हजार 112 नवे रुग्ण, 44 बाधितांचा मृत्यू

(Corona patients increased IN Mumbai, 4 building of Chembur sealed)
Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.