CISF च्या जवानांनी कोरोनाला गाडलं, 6 जवान कोरोनामुक्त, पनवेलमध्ये 10 जणांना डिस्चार्ज

राज्यभर कोरोनाचा कहर वाढत असताना, पनवेलमधून (Corona Positive CISF Jawan discharged) मोठी दिलासादायक बातमी आली आहे.

CISF च्या जवानांनी कोरोनाला गाडलं, 6 जवान कोरोनामुक्त, पनवेलमध्ये 10 जणांना डिस्चार्ज
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 2:03 PM

नवी मुंबई : राज्यभर कोरोनाचा कहर वाढत असताना, पनवेलमधून (Corona Positive CISF Jawan discharged) मोठी दिलासादायक बातमी आली आहे. पनवेल कोव्हिड उपजिल्हा रुग्णालयातील दहा कोरोना रुग्णांना पूर्ण उपचारानंतर आता घरी पाठवण्यात आले आहे. यामध्ये CISF च्या सहा जवानांचा समावेश आहे. तर 3 जण उलवे आणि 1 जण खारघरचा रहिवाशी आहे. या सर्व दहा जणांना आता काही दिवस घरातच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (Corona Positive CISF Jawan discharged)

10 जणांची दुसरी कोरोना चाचणीदेखील निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे दहा रुग्ण चार एप्रिलला रुग्णालयात दाखल झाले होते. तब्बल दहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने, पनवेल आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या रुग्णांवर डॉक्टरांनी अतिशय मेहनतीने उपचार करुन त्यांना कोरोना मुक्त केलं. उलवे, कळंबोली आणि खारघरच्या या दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली.

या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 4 एप्रिलला पनवेल तालुक्यातील 10 रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यानंतर, त्या सर्वांना पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांच्यावर मागील 16 दिवसात योग्य उपचार केल्यानंतर या सर्व 10 जणांची कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आली.

रात्री उशिरा या सर्व 10 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सर्व स्टाफने टाळ्या वाजवत निरोप दिला. एकूणच कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने पनवेलकरांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणता येईल.

इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तेही लवकरच पूर्ण बरे होतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. डॉ. नागनाथ येमपल्ले, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. राजेंद्र इटकरे, डॉ. सुनील खरात आणि सर्व शासकीय यंत्रणेला हे मोठे यश आले आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : आरोग्य मंत्री  

Pune Corona Update : पुण्यात ससून, भारती आणि नायडू रुग्णालयातील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.