वरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील, कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव
राज्यात कोरोनाने प्रचंड हातपाय पसरले आहेत. मुंबई या संसर्गाचं केंद्र झालं आहे. आता मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 5 हून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत (Corona suspect patient in Koliwada Worli).
मुंबई : राज्यात कोरोनाने प्रचंड हातपाय पसरले आहेत. मुंबई या संसर्गाचं केंद्र झालं आहे. आता मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 5 हून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत (Corona suspect patient in Koliwada Worli). त्यामुळे वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे. मागील 2 दिवसात त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलिस प्रशासन हायअलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे.
वरळी कोळावाडा परिसरात काल संशयित रुग्ण आढळल्याने, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच हा परिसर सील केला होता. कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं. त्यानंतर महापालिका प्रशासनाने इथे निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली.
त्यानंतर सोमवारी (30 मार्च) वरळीतील कोळीवाडा इथे संशयित रुग्णांचा आकडा वाढला. त्यामुळे आधीच बंद केलेल्या कोळीवाड्यात आणखी खबरदारी घेण्यात आली. कोळीवाड हा प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे येथे कोरोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील कोरोनाचा धोका अनेक पटीने वाढणार आहे. हाच धोका लक्षात घेऊन कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
या परिसरात अत्यंत काटेकोरपणे निर्जंतुकीकरण फवारण्या करण्यात येत आहेत. या परिसरात गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवरही निर्जंतुकीकरण फवारण्या केल्या जात आहेत.
कोळीवाड्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी कधी?
दरम्यान, कोळीवाडा येथे कोरोना संशयित सापडल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. तेथील नागरिक हा संसर्ग रोखावा अशी मागणी करत आहेत. वरळीतील नागरिक निकाळजे म्हणाले, “कोळीवाडा येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, असं असताना तेथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झालेल्या नाहीत. माझ्या बाजूला वरळी बसडेपो आहेत. तेथे कोळीवाड्यातील काही चालक व वाहक आजही कामावर आले आहेत. अशा स्थितीत या चालक वाहनांची आरोग्य विभागाने तातडीने चाचणी करावी. अन्यथा ते जेथे कामावर जातात तेथे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका आहे.”
महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?
मुंबई – 88 पुणे – 30 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर – 16 कल्याण – 7 नवी मुंबई – 6 ठाणे – 5 वसई विरार – 4 उल्हासनगर – 1 पनवेल – 2 पालघर- 1 यवतमाळ – 4 अहमदनगर – 5 सातारा – 2 कोल्हापूर – 2 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 01
एकूण 215
(Rise in Maharashtra Corona Patients)
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
(Rise in Maharashtra Corona Patients)
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
Pune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली
आईच्या औषधांसाठी निघालेल्या कॉन्स्टेबललाच पोलिस उपअधीक्षकांकडून मारहाण, बोटं फ्रॅक्चर
Corona LIVE: नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टर क्वारंन्टाईन
संबंधित व्हिडीओ:
Corona suspect patient in Koliwada Worli