महाराष्ट्राला दुसरं मोठं यश, मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त, महापालिकेच्या डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी

मुंबईतील तब्बल १२ रुग्णांचा (corona patients successfully cured ) रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयातील तब्बल १२ रुग्ण हे कोरोना झाले

महाराष्ट्राला दुसरं मोठं यश, मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त, महापालिकेच्या डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 10:30 AM

मुंबई : महाराष्ट्रातील डॉक्टरांना कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यश येताना (corona patients successfully cured ) दिसत आहे. कारण काल पुण्यातील कोरोनाबाधित पहिलं दाम्पत्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता मुंबईतील तब्बल १२ रुग्णांचा (corona patients successfully cured ) दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील तब्बल १२ रुग्ण हे कोरोना विषाणूमुक्त झाले असं म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. 

या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या शंभरीपार

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. पुण्यात आणखी 3 रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 101 वर गेला आहे. कोरोनाचा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी संचारबंदीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. (Corona Patients in Maharashtra above hundred)

पुण्यातील दाम्पत्य ठणठणीत

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी (Pune Corona Patient) महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे (Pune Corona Patient). याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात 9 मार्च रोजी पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोन्ही रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत 1 मार्चला दुबईवरुन आले होते.  दोघांचीही कोरोना तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते. या दाम्पत्यावर 13 ते 14 दिवस उपचार केल्यानंतर काल अखेर या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, पुण्यात आणखी 3 रुग्ण

Corona | महाराष्ट्राचं पहिलं कोरोनाबाधित दाम्पत्य ठणठणीत, कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.