Corona Update : कोरोना रोखण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली जाणार? अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक

| Updated on: Mar 24, 2021 | 10:10 PM

राज्य सरकार आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याचं कळतंय. त्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक पार पडली.

Corona Update : कोरोना रोखण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली जाणार? अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. अशास्थितीतही कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याचं कळतंय. त्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक पार पडली.(Maharashtra Government plans to set up an independent body to curb the spread of corona)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने स्वतंत्र संस्था स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील,अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग,अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग,सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग,कुलगुरू/कुलसचिव मुंबई विद्यापीठ, आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, संचालक आरोग्य सेवा (२) पुणे,संचालक आय. आय. टी.पुणे, कुलगुरू आय. सी. टी.मुंबई,संचालक नॅनो सेंटर मुंबई विद्यापीठ,प्राध्यापक तथा शास्त्रज्ञ आय.सी.टी. मुंबई, संचालक रेडीयल लॅबोरेटरी पुणे व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील 2021 मधील सर्वाधिक रुग्ण वाढ

राज्यातील आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

सर्वाधिक प्रभावित 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरं

देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.(9 cities in Maharashtra among the top 10 corona affected cities in the country)

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे

पुणे
नागपूर
मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
नांदेड
जळगाव
अकोला

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : 2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह!

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी ‘मिशन टेस्टिंग’ सुरु, ‘या’ ठिकाणी होणार चाचण्या

Maharashtra Government plans to set up an independent body to curb the spread of corona