Corona Update : धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करु, शरद पवारांना विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसह जनतेला एक आवाहन केलंय. आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करु, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

Corona Update : धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करु, शरद पवारांना विश्वास
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 5:07 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं अवघड बनत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसह जनतेला एक आवाहन केलंय. आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करु, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. (Sharad Pawar’s appeal to citizens and party workers on the background of Corona)

‘जनतेच्या सहकार्याची आवश्यकता’

“कोव्हिड-१९ ह्या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यशासन, पोलीस व प्रशासकिय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका व संलग्न कर्मचारी रूग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ह्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे”, असं मत शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

नागरिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

“नागरिकांना आवाहन आहे की, शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटयझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे या सुचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ वा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येते की, त्यांनी देखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा”, असं आवाहनही शरद पवार यांनी नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलंय.

रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचं आवाहन

“त्याचप्रमाणे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता रक्तदान शिबीरांचे कार्यक्रम देखील हिरीरीने राबवावेत. मला खात्री आहे की, आपण धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर ह्या महामारीवर निश्चित मात करू. धन्यवाद”, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh resign: अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

सचिन वाझेंचे बॉस अजून सापडलेले नाहीत; आता मुख्यमंत्री का बोलत नाहीत, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Sharad Pawar’s appeal to citizens and party workers on the background of Corona

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.