मोठी बातमी : कोविन ॲपमधील तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे.

मोठी बातमी : कोविन ॲपमधील तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 10:50 PM

मुंबई : कोरोना (कोविड 19) लसीकरण मोहिमेला आज (16 जानेवारी) देशभरात सुरुवात झाली. मात्र, आता या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत (Corona Vaccination stop for 2 days due to technical error in Covin App).

कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मात्र, यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे निर्देश शासनाने दिलेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत 17 जानेवारी आणि 18 जानेवारी असे 2 दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आले. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबईत केंद्रनिहाय लसीकरण

आज पहिल्या दिवशी लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व केद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली. दुपारी उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या 9 तर राज्य सरकारच्या 1 अशा 10 रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये दिवसभरात 1 हजार 926 कोरोना योद्ध्यांना लसीचे डोस देण्यात आले.

  • केईएम रुग्णालय : 243
  • सायन रुग्णालय : 188
  • नायर रुग्णालय : 190
  • कूपर रुग्णालय : 262
  • वांद्रे, भाभा रुग्णालय : 149
  • व्ही. एन. देसाई रुग्णालय : 80
  • राजावाडी रुग्णालयात : 289
  • डॉ. आंबेडकर रुग्णालय : 266
  • बीकेसी कोविड केंद्र : 220
  • जे. जे. रुग्णालय : 39
  • एकूण : 1,926

हेही वाचा :

लसीकरणामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल : प्रविण दरेकर

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया

प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात, पण सामान्यांचा नंबर कधी?; राजेश टोपे म्हणाले…

Corona Vaccination stop for 2 days due to technical error in Covin App

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.