Corona Vaccine for Child : कॉलेजला या लस घ्या, मुंबई महापालिकेचा 9 लाख मुलांच्या लसीकरणासाठी मेगा प्लॅन

केंद्र सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटामधील मुलांचं लसीकरण (Corona Vaccine for Child) करण्यास मंजुरी दिल्यानंतर मुंबई महापालिका (BMC) देखील कामाला लागली आहे.

Corona Vaccine for Child : कॉलेजला या लस घ्या, मुंबई महापालिकेचा 9 लाख मुलांच्या लसीकरणासाठी मेगा प्लॅन
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 9:34 AM

मुंबई: केंद्र सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटामधील मुलांचं लसीकरण (Corona Vaccine for Child) करण्यास मंजुरी दिल्यानंतर मुंबई महापालिका (BMC) देखील कामाला लागली आहे. मुंबईतील लहान मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेनं मेगा प्लॅन तयार केला आहे. मुंबईत 15 ते 18 वयोगटातील 9 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार आहे.

महाविद्यालयात मिळणार लस

कोरोना विषाणू संसर्ग आणि ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी सध्यातरी कोरोना लस हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळं, संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये देखील असणार लसीकरण केंद्रे असणार आहे. 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना सुलभ लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या 350 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्रांच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येताच दोन ते तीन दिवसांत लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. प्रसुतीगृह आणि महापालिकेची 350 लसिकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असेल. नीडलची साईज काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेकडे पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेतच. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईननंतर स्पष्टता येईल, असं सांगण्यात आलं आहे.

1500 जणांना प्रशिक्षण

1500 व्यक्तींच्या स्टाफला लहान मुलांच्या लसिकरणासाठी ट्रेनिंग देण्यात आलंय. खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनिंग देण्यात येणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणानंतर काही रिअॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करता येऊ शकेल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल, अशी माहिती आहे. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन आढळलेल्या नाहीत, अशी माहिती आहे.

इतर बातम्या:

Sumant Ruaikar : सुमंत रुईकरच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेनेची, त्यांना काही कमी पडू देणार नाही : एकनाथ शिंदे

मोठी बातमी! समीर मेघेंसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण, 32 जणांमध्ये कुणाकुणाचा समावेश?

Corona Vaccine for Child BMC prepare plan to 9 lakh children’s corona vaccination programme wait for Center guidelines

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.