मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकजण ज्याचा इशारा करत होता तेच झालंय. राज्यातील इतर ठिकाणांसोबतच आता मुंबईतील महत्त्वाच्या लसीकरण केंद्रावरील कोरोना लस संपलीय. अनेक लसीकरण केंद्रावर शून्य लसीचा साठा आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (9 एप्रिल) अनेक लसीकरण केंद्रावर लस उपब्लध नसणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाशी लढा देण्याचं प्रमुख साधनच म्यान झालंय (Corona Vaccine storage finished in Many Corona Vaccination centre in Mumbai).
Vaccination centres which will be operational in #mumbai on 9 April 2021
However due to limited stock this might exhaust at early n few centre will be declared out of stock.
However no worries all centre will start with full capacity asap.
Centres marked red will be closed 2mrw. pic.twitter.com/VGCOWu6kDi— KIRAN DIGHAVKAR (@DighavkarKiran) April 8, 2021
मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली. ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे.
राज्यात कोरोना लसीचा तुटवडा
राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रांवरही आज पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक होता.
आरोग्यमंत्र्यांची तातडीची बैठक
दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या 7 कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. राज्यात रेमडेसिव्हीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावं. रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात यावेत. उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच इंजेक्शनचा पुरवठा करावा. तसंच काळाबाजार होऊ नये म्हणून एमआरपी कमी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Corona Vaccine storage finished in Many Corona Vaccination centre in Mumbai