मुंबईत आता अत्यावश्यक सेवेतली दुकाने आठवडाभर ओपन राहणार, इतर नियम काय?
महाराष्ट्रात कोरोनाचा वेग कमी होताच सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवलं असलं तरीसुद्धा अनेक गोष्टींमध्ये मोकळीक दिली आहे (Essential Services Shops).
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वेग कमी होताच सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवलं (Essential Services Shops) असलं तरीसुद्धा अनेक गोष्टींमध्ये मोकळीक दिली आहे. त्यातच बीएमसीने ब्रेक द चेन ऑर्डर जारी केली आहे (Corona Virus Lockdown Update BMC Gave Permission To Open Essential Services Shops Throughout The Week).
मुंबईत कोणती दुकाने कधी उघडणार?
मुंबईत अत्यावश्यक सेवेतली दुकाने रोज सकाळी सातपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार. इतर दुकानांसाठी बीएमसीनं वेगळे नियम जारी केलेत. त्यात कॅटरींगपासून ते इतर दुकानं, जी रोडच्या डाव्या बाजुला आहेत, ती सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ओपन राहतील तर जी रस्त्याच्या उजव्या बाजुला दुकानं आहेत, ती मंगळवार आणि गुरुवारी सुरु असतील. अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकानं शनिवार आणि रविवारी बंद असतील. ई कॉमर्सच्या सेवा मात्र चालू राहतील.
महाराष्ट्रातली कोरोना स्थिती
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15,077 केसेस समोर आल्या आहेत. तर 33000 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या 24 तासात 184 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 3,95,370 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातला रिकव्हरी रेट हा 93.88 टक्के एवढा आहे. कोरोनाने मृत्यू दर 1.66 टक्के एवढा आहे. 3,50,55,054 सँपल्सपैकी 57,46,892 जण पॉजिटीव्ह सापडलेत. सध्य स्थितीत 18,70,304 लोक होम क्वारंटाईन आहेत. सध्य स्थितीत 2, 53, 367 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई शहराने कोरोनाला कसं रोखलं? इक्बाल सिंह चहल यांचा राज्यातील महापालिका आयुक्तांशी संवादhttps://t.co/uWvELSTU8X#Corona #MumbaiCorona #IqbalSinghChahal #Mumbai #CoronaUpdate #CoronaCases
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
Corona Virus Lockdown Update BMC Gave Permission To Open Essential Services Shops Throughout The Week
संबंधित बातम्या :
मुंबईकरांना मोठा दिलासा! आज फक्त 676 रुग्ण सापडलेत
दिलासादायक! राज्यात आज 15,077 नव्या रुग्णांची नोंद, 184 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्र