VIDEO: मुंबईच्या उच्चभ्रू रुग्णालयातील जागा संपली; रुग्णांवर व्हरांड्यात बेडस् टाकून उपचार
हा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयातील व्हीडिओ असल्याचे सांगितले जात आहे. | Coronaviurs situation in Mumbai

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आता मुंबईसारख्या शहरातील आरोग्य यंत्रणाही कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कोरोना रुग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये बेडस शिल्लक राहिलेले नाहीत. मात्र, अनेकांना ही गोष्ट सांगूनही खरी वाटत नाही. सरकार उगाच परिस्थितीचा बागुलबुवा करत असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुंबईतील एका नामांकित रुग्णालयातील परिस्थिती पाहून तुम्हाला या भयाण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. (patients taking treatment in lift lobby at leading hospital in Mumbai)
Hospitals are full. Shortage of critical medicines. No vaccines. Situation in Mumbai grim. Be careful. Here is a scene of the lift lobby of a leading hospital in Mumbai! pic.twitter.com/i8nAwEHpOd
— Harsh Goenka (@hvgoenka) April 10, 2021
कालपासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयातील व्हीडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी बेडस् संपल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने लिफ्टने ये-जा करण्याचा मार्ग असलेल्या लॉबीत खाटा टाकून उपचार करायला सुरुवात केली आहे. या व्हीडिओत सलाईन लावलेले अनेक रुग्ण दिसत आहेत.
त्यामुळे ही मुंबईतील उच्चभ्रू रुग्णालयांची अवस्था असेल तर सरकारी आणि इतर सामान्य रुग्णालयांमध्ये काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. सध्या पुणे, नाशिक या शहरांमध्ये सरकारी रुग्णालये आणि कोव्हिड सेंटर्समध्येही उपचारासाठी जागा उरलेली नाही. व्हेंटिलेटर्स बेडस आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे.
या तुलनेत मुंबईत प्रत्येक दिवशी जवळपास 10 हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांपेक्षा हा आकडा कितीतरी मोठा आहे. त्यामुळे आगामी काळात हीच परिस्थिती राहिल्यास मुंबईसारख्या शहरात रुग्णांना मिळेल त्या जागेत उपचार करुन घेण्याची वेळ ओढावली आहे.
मुंबईतील कोरोना स्थिती?
मुंबईत गेल्या 24 तासांत 9 हजार 327 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या मात्र वाढली आहे. दिवसभरात 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमधील 30 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 34 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.
मुंबईत सध्या 91 हजार 108 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झालाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपला आहे.
(patients taking treatment in lift lobby at leading hospital in Mumbai)