शेवटच्या दिवशी वसईपासून उल्हासनगरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; अनेकांचा हद्दींवर आक्षेप!
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाचू लागले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महापालिकेकडे या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या.
ठाणे: ठाणे आणि पालघर (thane-palghar) जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाचू लागले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महापालिकेकडे (corporation) या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. नगरसेवकांपासून सामान्य नागरिकांनीही काल शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचना मांडल्या. यावेळी बहुतेकांनी काही भागातील प्रभाग रचनांवर हरकत घेतली. काहींनी प्रभागांची हद्द चुकीच्या पद्धतीने कशी बदलली यावर बोट ठेवले. तर कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनी उल्हासनगरमधील (ulhasnagar) काही भाग कसा केडीएमसीत दाखवला हे पालिकांच्या निदर्शनास आणून दिलं. वसईत एकूण 79 सूचना आणि हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. कालच्या दिवसात 32 हरकती नोंदवल्या गेल्या. ठाण्यात 1962, कल्याण-डोंबिवलीत 997, नवी मुंबईत 3000 आणि उल्हासनगरात 130 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.
गेल्या 2 वर्षांपासून लांबलेल्या पालिका निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. वसई-विरार महापालिकेत 14 दिवसात प्रभाग रचनेवर 79 हरकती आल्या. काल शेवटच्या दिवशी सोमवारी एकाच दिवसात सर्वाधिक 32 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. 1 ते 14 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. काल त्याचा शेवटचा दिवस होता. महापालिकेत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचे विवरण 16 फेब्रुवारी रोजी वसई विरार महापालिका निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी हरकती आणि सूचनांची सुनावणी होणार असून, 2 मार्च रोजी अंतिम मंजुरीला पाठविला जाणार आहेत.
वसईचं चित्रं काय?
सदरचा आराखडा हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने बनविला आहे. या पालिकेत यंदा 126 सदस्यांसाठी 42 प्रभागात निवडणूक होणार आहे. एका प्रभागात 3 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. 126 पैकी 6 जागा अनुसूचित जाती, 6 जागा अनुसूचित जमातीसाठी असणार आहेत. महिलांसाठी 63 जागा राखीव असून त्यातील अनुसूचित जाती आणि जमातीसाठी प्रत्येकी 3 जागा राखीव असणार आहेत. 2011 च्या जनगणने नुसार वसई विरार महापालिकेत 12 लाख 34 हजार 690 एवढी मतदारसंख्या आहे. वसई विरार महापालिकेतील नव्या प्रभाग रचनेनुसार सर्वात मोठे प्रभाग 01, 02, 09, 28, 33, 42 तर सर्वात लहान प्रभाग 04, 05, 06, 07, 12, 15, 16, 17, 21, 22, 23, 29, 30, 31 आहेत.
कोणत्या प्रभागात किती हरकती
प्रभाग अ बोळींज 08, प्रभाग ब विरार पूर्व 10, प्रभाग क चंदनसार 07, प्रभाग ड नालासोपारा पूर्व 04, प्रभाग ई नालासोपारा पश्चिम 08, प्रभाग फ पेल्हार-धाणीव 09, प्रभाग जी वालीव 24, प्रभाग एच नवघर-माणिकपूर 01, प्रभाग आय वसई 01, एकूण 79 हरकती आल्या आहेत.
ठाण्यात रांगा
दरम्यान, ठाण्यात हरकती नोंदवण्यासाठी काल नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. 9 प्रभाग समित्यांमध्ये या रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ असल्याने नागरिकांनी शेवटच्या दिवशी आपले म्हणणे मांडले. तर, कल्याण-डोंबिवली पालिकेत शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 15 February 2022#MahaFast100 #News pic.twitter.com/MdqiJOtfnu
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2022
संबंधित बातम्या:
केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळात घोळ, उल्हासनगरचा काही भाग दाखवला केडीएमसीत; आमदार गायकवाड म्हणतात…
आदिवासी पाड्यावर घरकूल योजना राबवा, अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या म्हाडा, केडीएमसीला सूचना