Indian Railways : टिटवाळा ते आंबिवलीदरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटले, वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा संताप

आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास आंबिवली ते टिटवाळा दरम्यान मालगाडीचं कपलिंग तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये (Passengers) संतापाची लाट उसळल्याचे पहायला मिळाले.

Indian Railways : टिटवाळा ते आंबिवलीदरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटले, वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा संताप
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 1:53 PM

मुंबई : कल्याण (Kalyan)ते कसारा (Kasara) दरम्यानच्या रेल्वे प्रवासात अडचणीची मालिका सुरूच असते. अनेकदा अशा अचानक उद्धभवणाऱ्या अडचणीमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यांना इच्छितस्थळी जाण्यास उशीर होतो. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास आंबिवली ते टिटवाळा दरम्यान मालगाडीचं कपलिंग (Coupling) तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पहायला मिळाले. तर दुसरीकडे काल रात्री आसनगाव ते वासींद दरम्यान एक तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र हा मेगाब्लॉक अचानक घेण्यात आल्याने त्याचा परिणाम हा रेल्वे  वाहतुकीवर झाला. पहाटे अनेक गाड्या रद्द केल्याने कासारा ते कल्याण असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. याप्रकरावर प्रवासी संघटनांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. हा प्रकार नेहमी घडत असून, प्रवाशांना अनेकदा घरी पोहोचण्यासाठी उशिर होतो, त्यांना घरदार नाही का? असा संतप्त सवाल प्रवाशी संघटनांकडून करण्यात आला आहे.

प्रवाशांचा संताप

आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास आंबिवली ते टिटवाळा दरम्यान मालगाडीचं कपलिंग तुटल्याने रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. आज रविवार आहे, मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यात भरीसभर म्हणून मालगाडीचं कपलिंग तुटल्यामुळे टिटवाळा ते आंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. लोकलला विलंब होत असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली. आज मेगा ब्लॉक असल्याने काही लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही इतर मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, त्यामुळे आधीच रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत आहे. त्यात मालगाडीचं कपलिंग तुटल्याने वाहतूक आणखी विस्कळीत झाली, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

आज मेगा ब्लॉक

विविध तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉग घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे अनेक गाड्या आज उशीराने धावत आहेत. तर सोबतच  हार्बर मार्गावरही आज मेगा ब्लॉग घेण्यात आला आहे. बेलापूर- खारकोपर बीएसयू हे मार्ग वगळता इतर मार्गावर सकाळी 11.5 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.