ना वही ना पेन, दैनंदिन वापराच्या वस्तुंनाही नकार, वाझेंना कोर्टाचा झटका; कोठडीत 5 मेपर्यंत वाढ

सचिन वाझे यांच्यासोबतच निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी यांच्यासुद्धा न्यायालयीन कोठडीत 5 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (sachin vaze riyaz kazi mukesh ambani)

ना वही ना पेन, दैनंदिन वापराच्या वस्तुंनाही नकार, वाझेंना कोर्टाचा झटका; कोठडीत 5 मेपर्यंत वाढ
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:20 PM

मुंबई : अँटालिया स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani bomb scare case) आणि उद्योजक मनसुख हिरेन संशयास्पद मृत्युप्रकरणातील ( Mansukh Hiren death) प्रमुख आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आगामी 5 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाझे यांच्यासोबतच निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी ( Riyaz Kazi) यांनासुद्धा 5 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी वाझे यांनी केलेल्या एकूण तीन मागण्यांपैकी दोन मागण्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आज (23 एप्रिल) एनआयएच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने वरील निर्णय दिला. (court extended judicial custody of Sachin Vaze and Riyaz Kazi in Mansukh Hiren death murder case and Mukesh Ambani bomb scare case)

सचिन वाझेंना 5 मेपर्यंत कोठडी

उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या अँटेलिया घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आलेली स्फोटकं तसेच उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर  सचिन वाझे यांची सलग दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर 14 मार्च रोजी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना एनआयच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ते तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत होते. त्यांना 9 एप्रिल रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केल्यांनतर कोर्टाने त्यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यांतर आज (23 एप्रिल) पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी रियाज काझी यांचीसुद्धा कोठडी वाढवण्यात आलीये.

वाझेंना पेन कार्बन कागद देण्यास मनाई

यावेळी सुनावणीदरम्यान, सचिन वाझे यांनी न्यायालयाकडे एकूण तीन मागण्यांसाठी अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी आपल्या वकिलामार्फत एक पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा असं म्हटलं होतं. मात्र, वाझे यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. त्याबरोबरच वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषध मिळावी यासाठीसुद्धा वाझे यांनी दुसरा अर्ज केला होता. मात्र प्रिस्कीप्शन नसल्याने सोबत प्रिस्कीप्शन जोडा असा युक्तिवाद यावेळी NIAच्या वकिलांनी न्यायालयात केला. वाझे यांनी दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळावे अशीसुद्धा न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र, तो अर्जसुद्दा न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून पोलीस निरीक्षक सुनील माने (Sunil Mane) असल्याचा दावा राष्ट्रीय पोलीस यंत्रणेने कोर्टात केला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी सुनील माने यानेच फोन करुन त्यांना बोलावलं होतं. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलंय. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले

मोठी बातमी ! देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असं काय घडलं, ज्यामुळे केजरीवालांना मोदींची माफी मागावी लागली?

(court extended judicial custody of Sachin Vaze and Riyaz Kazi in Mansukh Hiren death murder case and Mukesh Ambani bomb scare case)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.