निलंबित पोलीस अधिकारी सुनिल माने यांना गुंडांकडून धोका ?, कारागृहात संरक्षण देण्याचे न्यायालयाचे आदेश

माने यांच्या कुटुंबाने त्यांच्या जीवितास धोका असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने सुनिल माने यांना कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. (sunil mane mansukh hiren death case)

निलंबित पोलीस अधिकारी सुनिल माने यांना गुंडांकडून धोका ?, कारागृहात संरक्षण देण्याचे न्यायालयाचे आदेश
Kandivali-Crime-Branch-Police-Inspector-Sunil-Mane
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 4:34 PM

मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन (Mansukh Hiren death case) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने (Sunil Mane) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आज ( 1 मे) सुनील माने यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुनील माने यांना  13 मे पर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच माने यांच्या कुटुंबाने त्यांच्या जीवितास धोका असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने सुनिल माने यांना कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. (court ordered provide security to Sunil Mane who is in judicial custody related to Mansukh Hiren death case)

सुनिल मानेंच्या जीवितास धोका, नातेवाईकांचा दावा

ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सुनिल माने यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी सुनील माने यांचे नातेवाईकसुद्धा न्यायालयात हजर होते. या नातेवाईकांनी निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी च्यांच्या कर्तव्यादरम्यान अनेक गुंडावर कारवाई केली आहे. त्यामुळे कारागृहात गेल्यावर गुंडांकडून धोका असल्याचा दावा केला. त्यानंतर ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर सुनील यांना कोठडीमध्ये संरक्षण द्यावं, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले.

सुनिल माने यांना कशामुळे कोठडी ?

ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात निलंबित पोलीस निरक्षक सुनील माने यांचासुद्धा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. मनसुख हिरेन यांना 4 मार्च रोजी रात्री एका व्यक्तीने फोन केला. यावेळी आपण कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे बोलतोय असे हिरेन यांना सांगण्यात आले. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जी तुमची गाडी सापडली होती; त्याबाबत तुमच्याशी बोलायचं आहे, अस सांगून मनसुख यांना घोडबंदर रोड येथे बोलावण्यात आलं होतं. मनसुख हिरेन तिथे आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन ठार मारण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह कळवा खाडीत टाकण्यात आला होता, असे एनआयएचे म्हणणे आहे. तसेच या सर्व कटात सुनील माने यांचासुद्धा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. याच कारणामुळे सुनिल माने यांना मागील आठवड्यात आठवड्यात अटक करण्यात आली.

मनसुख हिरेन यांना सुनिल मानेंकडून फोन ?

मनसुख हिरेन यांना तावडे नावाने जो फोन आला होता. तो सुनील माने यांनीच केला होता, असं एनआयएच्या सूत्रांच म्हणणं आहे. त्याप्रमाणे मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सात ते आठ जण कळवा खाडी येथे गेले होते. त्या आठ जणांत सुनील माने हेसुद्धा होते, असं एनआयएच्या सूत्रांच म्हणणं आहे.

सुनिल माने परमबिर सिंग यांच्या जवळचे

दरम्यान, सुनील माने हे 1995च्या बॅचचे अधिकारी आहे. सुनील सध्या मुंबई क्राईम ब्रांचच्या कांदिवली युनिट येथे इंचार्ज पोलीस निरीक्षक होते. परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर सुनील यांच्यावर युनिट 11 ची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुनील माने हे परमबीर सिंग यांच्या जवळच्या वर्तुळातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा महत्वाची कामगिरी असेल तेव्हा सुनील हे सक्रिय असायचे. सध्या ते न्यांची न्यायलयीन कोठडी 13 मे पर्यंत वाढवली असून त्यांना संरक्षण पुरवण्याचे तोंडी आदेश न्यायालयाने दिले आहेत.

इतर बातम्या :

अब्जाधीशाचा तब्बल 4 हजार महिलांसोबत सेक्स ?, मात्र शेवटच्या बायकोकडून विष देऊन खून, कारण काय ?

मुंबई हादरली! टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

(court ordered provide security to Sunil Mane who is in judicial custody related to Mansukh Hiren death case)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.