Maharashtra coronavirus updates : पोहरादेवी गडावरील महंतासह कुटुंबातील चौघांना कोरोना
Covid 19 : Maharashtra coronavirus updates : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा मुसंडी मारली आहे. वाशिममध्ये तब्बल 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येने (Maharashtra coronavirus updates) पुन्हा मुसंडी मारली आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात (maharashtra corona update) तब्बल 8807 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे वाशिममध्ये तब्बल 229 विद्यार्थ्यांना (Washim corona updates) कोरोनाचा संसर्ग झाला. पुण्यात कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचे सर्व अपडेट एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
Nashik corona updates : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 424 नवीन रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 424 नवीन रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे..यामध्ये शहरातील 260 जणांचा समावेश असल्याने शहरातील वाढता आकडा लक्षात घेता महापालिका प्रशासन कोरोना संदर्भातील नियम आणखी कठोर करण्याची शक्यता आहे.दरम्यान जिल्ह्यातील एक्टिव्ह रुग्णसंख्या 2162 वर पोहीचली असून ग्रामीण भागात सर्वाधिक 85 रुग्ण निफाड तालुक्यात आढळून आले आहेत.
-
Nashik corona updates : ग्रामीण भागातही विनामास्क दिसल्यास 1 हजार रुपये दंड
नाशिक शहरासह आता ग्रामीण भागातदेखील विनामास्क दिसल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. एवढंच नाही ,तर मास्क नीट घातलेला नसेल तरी देखीलदंड होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विना मास्क संदर्भातील कारवाईचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत, तसेच जमा झालेल्या दंडाच्या रकमेचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी देखील तहसीलदारांवर देण्यात आली आहे.
-
-
Washim Pohradevi corona Update पोहरादेवी गडावरील महंतासह कुटुंबातील चौघांना कोरोना
वाशिम : पोहरादेवी येथील एका महंतासह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह, गावातील इतर 3 जणांसह एकूण 8 जण कोरोना पॉझिटिव्ह, पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते, त्यामुळं कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता, आरोग्य विभागाने 22 फेब्रुवारीला केली होती तपासणी
-
Aurangabad Corona update : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात 281 कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात 281 कोरोना रुग्णांची वाढ, रुग्णांचा आकडा पोचला 46721 वर, तर काल दिवसभरात 71 रुग्णांना देण्यात आली सुट्टी, सध्या रुग्णालयात 1312 रुग्णांवर उपचार सुरू, तर काल दिवसभरात 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला
Published On - Feb 25,2021 1:01 PM