आजपासून गर्भवती मातांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु; बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील 35 ठिकाणी मोहिम सुरु
‘कोविड - 19’ बाधित 95 टक्के मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित 5 टक्के नवजात बालके प्रसुतीच्या अपेक्षित तारखेपूर्वी जन्माला येऊ शकतात.
मुंबई : ‘राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट’ आणि कोविड – 19 लसीकरणासाठी असलेला ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्या शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड – 19’ लसीकरणात समाविष्ट केले आहे. आजपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 35 लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे. दुपारी 2 ते 5 ह्या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. (Covid preventive vaccination of pregnant mothers starts from today; Campaign started at 35 places in mumbai)
बाधित गरोदर महिलांमध्ये प्री-मॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता अधिक
सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘कोविड – 19’ चा तीव्र संसर्ग (severe infection) होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड – 19’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसुती (pre-mature delivery) होण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘कोविड – 19’ बाधित 90 टक्के गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे 10 टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड – 19’ आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते.
कोरोना बाधित मातांची 95 टक्के नवजात बालके सुस्थितीत
तथापि, ‘कोविड – 19’ बाधित 95 टक्के मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित 5 टक्के नवजात बालके प्रसुतीच्या अपेक्षित तारखेपूर्वी जन्माला येऊ शकतात. अशा बालकांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणाऱ्या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरु शकते.
गर्भवती महिलांचे ‘कोविड – 19’ लसीकरण करण्यासंदर्भातील निर्देश खालीलप्रमाणे
1. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.
2. प्रत्येक गरोदर महिलेने या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी व पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने (informed choice) लसीकरण करवून घ्यावे.
3. ज्या महिलांना ‘कोविड – 19’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांनी ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’ किंवा ‘convalescent’ प्लाझ्मा हा उपचार घेतले असतील, अशा महिलांना 12 आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल. (Covid preventive vaccination of pregnant mothers starts from today; Campaign started at 35 places in mumbai)
Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा ‘धमाका डान्स’; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !https://t.co/b0uILJqlhy#viral | #ViralVideo | #Dance
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2021
इतर बातम्या
SBIकडून कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी; 16 आणि 17 जुलैला बँकिंग सेवा काही तासांसाठी बंद
Video : कुलदीप, चहलची धमाल, दमशेराजमध्ये कोण जिंकलं? तुम्हीच पाहा