खासगी रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रे आता 24/7 सुरु, बीएमसीच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ‘कोव्हिड-19’ लसीकरण (Covid Vaccination Centers In Private Hospitals) विषयक समन्वयनात्मक कारवाई करण्यात येत आहे.

खासगी रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रे आता 24/7 सुरु, बीएमसीच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
corona-vaccine
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 9:35 AM

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ‘कोव्हिड-19’ लसीकरण (Covid Vaccination Centers In Private Hospitals) विषयक समन्वयनात्मक कारवाई आणि अंमलबजावणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर सुयोग्यप्रकारे करण्यात येत आहे (Covid Vaccination Centers In Private Hospitals Now Open 24/7 After Central Government Approval).

दरम्यान, सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविणे, याबाबत आवश्यक ते सर्व व्यवस्थापन सुयोग्यप्रकारे करणे आणि कोव्हिड लसीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे आणि संबंधित आदेश पुढीलप्रमाणे –

1. वय-वर्षे 60 पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींची लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 9 मार्च 2021 पर्यंत 1 लाख 36 हजार 491 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय-वर्षे 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत असून, या गटातील 15 हजार 272 व्यक्तींचं लसीकरण 9 मार्च 2021 पर्यंत करण्यात आले आहे.

2. वरील दोन्ही वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीचे वय लक्षात घ्यावयाचे आहे. यानुसार, आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचं वय 44 वर्षे 3 महिने असले, तरी देखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे आणि नंतर लसीकरण करणे शक्य आहे, ही बाब महानगरपालिका आयुक्त महोदयांनी आजच्या बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केली.

3. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यानुसार, केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्याची विनंती महापालिकेने केंद्र शासनाकडे केली आहे. याबाबत देखील आजच्या बैठकी दरम्यान चर्चा झाली. केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार मुंबईतील रुग्णालयांनी आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरु राहणारी लसीकरण केंद्रे सुरु करावीत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान केले. तर अनेक खासगी रुग्णालयांनी 24 तास कार्यरत राहणारे लसीकरण केंद्र सुरु करण्यात स्वारस्य दाखविले.

4. वरीलनुसार 24 तास कार्यरत राहणारी लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेता, अशा प्रकारची लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज 1 लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान नमूद केला. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे 30 लाख आहे, ही बाब लक्षात घेतल्यास आणि दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल. कोव्हिडचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असतो, त्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असल्याचेही महापालिका आयुक्तांनी नमूद केले.

5. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्या सुरु असणारी लसीकरण केंद्रे ही 8 तास ते 12 तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. या लसीकरण केंद्रांद्वारे दिनांक 9 मार्च, 2021 रोजी 38 हजार 266 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. ही लसीकरण केंद्रे 24 तास कार्यरत झाल्यास दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान व्यक्त केला. त्याचबरोबर आणखी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले (Covid Vaccination Centers In Private Hospitals Now Open 24/7 After Central Government Approval).

6. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तिंचे लसीकरण करण्यापूर्वी त्यांची नोंदणी ही संबंधित भ्रमणध्वनी अॅपवर, अर्थात कोव्हिन अॅपवर होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्याय देखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. रुग्णालयांच्या स्तरावर संबंधित संकेतस्थळाद्वारे नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे आजच्या बैठकी दरम्यान मांडण्यात आली.

याबाबत महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेली चमू तात्काळ गठीत करण्याचे आणि सदर चमू दिनांक 11 मार्च, 2021 पासून महापालिकेच्या ‘1916’ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न करण्याचे आदेश दिले. जेणेकरुन रुग्णालयांच्या स्तरावर थेट नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास सदर दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अडचणीचे निवारण करता येऊ शकेल.

7. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र शासनाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. परंतु, ज्यांनी अद्यापही लसीकरण केंद्र सुरु केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी माहितीही आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आली.

8. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हिड बाधित रुग्णांची संख्या सध्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज असून संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या स्तरावर आवश्यक ते सर्व नियोजन सुव्यवस्थित प्रकारे करण्यात आले आहे. हे नियोजन करताना रुग्णालये, आय. सी. यू. खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरीय नियोजन देखील यापूर्वीच करण्यात आले आहे.

Covid Vaccination Centers In Private Hospitals Now Open 24/7 After Central Government Approval

संबंधित बातम्या :

COVID-19 Vaccine | पंतप्रधान मोदी यांच्या आईने घेतली कोरोना लस, मोदी म्हणतात…

मधुमेह असणाऱ्या रुग्णांचा कोरोना लसीमुळे मृत्यू होतो? वाचा व्हायरल मेसेज मागचं सत्य

CM Uddhav Thackeray Covid19 Vaccine | मुख्यमंत्र्यांसोबत सासूबाईही जेजेत, ठाकरे कुटुंबातून कोणी-कोणी लस घेतली?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.