Ashish Shelar : महापौर किशोरी पेडणेकरांविषयीचं वक्तव्य भोवलं, आशिष शेलारांवर गुन्हा दाखल
आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासंबंधीच्या वक्तव्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासंबंधीच्या वक्तव्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरळीतल्या सिलिंडर स्फोट(Worli Cylinder Blast)प्रकरणी टीका करताना शेलारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
‘…म्हणून लक्ष्य’ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devedndras Fadnavis) यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
‘वक्तव्य अवमानकारक’ भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chankar) यांनी दिलीय. मुंबईच्या मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावी, असे निर्देश दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
भाजपाचं समर्थन वरळीतल्या घटनेवेळी महापौर निजल्या, असं वक्तव्य शेलार यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र अशा छोट्या-मोठ्या घटनेवरून घाबरणारे नाहीत. जाणिवपूर्वक दबाव टाकून सत्तेचा दुरुपयोग करून अशाप्रकारे गुन्हा दाखल केला जातोय असे भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलंय. तर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही टीका करताना महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संजय राऊतां(Sanjay Raut)सारखे लोक आक्षेपार्ह बोलतात, त्यावेळी काय भूमिका आहे, असा सवाल त्यांनी केलाय.