हत्या, आत्महत्येनं मुंबई हादरली, भिवंडीत गळा चिरला, वसईत एकाच कुटुंबात आत्महत्या

हत्या आणि आत्महत्येच्या घटनांनी मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. भिवंडीत एका 46 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे.

हत्या, आत्महत्येनं मुंबई हादरली, भिवंडीत गळा चिरला, वसईत एकाच कुटुंबात आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 4:11 PM

मुंबई : हत्या आणि आत्महत्येच्या घटनांनी मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे (Crime In Mumbai). आज मुंबईतील भिवंडीत एका 46 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. तर नालासोपाऱ्यात मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये 10 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे (Crime In Mumbai).

नालासोपाऱ्यांत तिघांची आत्महत्या

पहिल्या घटनेत नालासोपाऱ्यात मालगाडीखाली येऊन एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केली आहे. या 3 जणांपैकी 10 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. जखमी चिमुकलीला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये आई, मुलगा आणि 10 वर्षीय मुलीचा समावेश होता. यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

नालासोपारा आणि वसई दरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन या तिघांनी आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी कशीबशी बचावली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून लोहमार्ग पोलीस याचा शोध घेत आहेत (Crime In Mumbai).

भिवंडीत महिलेचा खून

भिवंडी शहरात एका 46 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. हाफसन आळी येथील ही घटना आहे. पूजा लक्ष्मण बुरला असे हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी या विधवा महिलेसोबत तिचा मुलगाही होता. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. महिलेचा खून कोणी केला, का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Crime In Mumbai

संबंधित बातम्या :

मित्राच्या शरीराचे 11 तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, खुनी नवरा-बायकोला बेड्या

दोन महिन्याच्या चिमुरडीची बापाकडून हत्या, इंदापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.