“या पोटनिवडणुकीत भाजपाने विकृत दर्शन घडवले”; काँग्रेस नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केले..

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटले की, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्चयाकडून पैसे वाटणे ही भाजपाची संस्कृती नाही असं त्यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले होते.

या पोटनिवडणुकीत भाजपाने विकृत दर्शन घडवले; काँग्रेस नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केले..
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 6:32 PM

मुंबईः पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीचे मतदान होऊनही आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच काल पोटनिवडणुकीचे मतदान सुरू असताना भाजपकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करत संबंधित नेत्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. त्यातच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

पोटनिवडणुकीच्या राजकारणावरून जोरदार आरोप करत नाना पटोले यांनी सांगितले की, रवींद्र धंगेकर हे आमचे उमेदवार आहेत. मात्र नुकताच झालेल्या निवडणुकीत रवींद्र धंगेकरच निवडून येतील असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटले की, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्चयाकडून पैसे वाटणे ही भाजपाची संस्कृती नाही असं त्यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले होते.

मात्र निवडणुकीच्या त्याच रात्री त्यांच्या नगरसेवकाला पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या प्रकारामुळेच भाजपने मतदारांना पैसे देऊन त्यांनी मत मिळवली आहेत अशी गंभीर टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटून आणि भाजपची पैसे वाटण्याची संस्कृती नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या निवडणुकीत भाजपने विकृत दर्शन दिले असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

पोटनिवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपकडून बेकायदेशीर पणे कोणत्याही गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या पोटनिवडणुकीतील पैसे वाटण्यावरून भाजपाबाबत निवडणूक आयोगाकडे प्रचंड तक्रारी करण्यात आल्या आहेत अशी टीकाही करण्यात आली आहे.

भाजपबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असल्याने सगळ्यात जास्त तक्रारी होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पोटनिवडणुकीत भाजपने आपले विकृत दर्शन दाखवले असल्यामुळेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्लीही करण्यात आल्याची गंभीर टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.