मुंबईः भाजपचे किरीट सोमय्या आणि ठाकरे गटाच्या अनिल परबांची शाब्दिक लढाई आता रस्त्यावर आलीय..वांद्र्यातील म्हाडाच्या सोसायटीत परबांचं अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप सोमय्यांनी केला..त्यावरुन परबही आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यामधील वाद आता एकमेकांना पाहून घेण्यापर्यंत आला आहे. वांद्र्यातील म्हाडाच्या वसाहतीतलं अनिल परब यांचे कार्यालय पाडण्यावरुन चांगलाच हंगामा झाला आहे. म्हाडाच्या कार्यालयातही शिवसैनिक घुसले होते तर म्हाडाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांसोबत शिवसैनिकांची झटापटही झाली आहे.
या वादाची सुरुवात वांद्र्यातील म्हाडाच्या वसाहतीतलं परब यांचे कार्यालय म्हाडाचे अधिकारी पाडणार होते. पण सोमवारी रहिवाशांनीच पाडले होते.
हेच पाडकाम पाहण्यासाठी किरीट सोमय्या येत आले होते, मात्र आक्रमक झालेले शिवसैनिक पाहून पोलिसांनी त्यांचा ताफा बीकेसी परिसरातच थांबवला गेला होता.
त्याचवेळी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांना येऊनच दाखवा, स्वागतासाठी शिवसैनिक तयार आहेत, अशा शब्दात आव्हान दिलं होतं.
अनिल परब यांनी सोमय्यांना आव्हान दिल्यानंतर पोलिसांनीही किरीट सोमय्यांना पुढे येऊ दिलं नाही. बीकेसी पररिसरात पाऊण तास थांबवल्यानंतर, सोमय्या भाजपच्या कार्यालायकडे निघाले, पण निघण्याआधी त्यांनी अनिल परब यांना पुन्हा डिवचले होते.
वांद्र्याच्या म्हाडा सोसायटीत सोमय्या न आल्यानं शिवसैनिकांनी आपला मोर्चा म्हाडाच्या कार्यालयाकडे वळवला होता. काही शिवसैनिक थेट कार्यालयात घुसले आणि सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली.
थोड्याच वेळात अनिल परबही म्हाडाच्या कार्यालयाच्या परिसरात आले आणि त्याचवेळी शिवसैनिकांचा जमावही मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याचवेळी गेटच्या आत जावू पाहण्याऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं होते,
तर त्यामुळं पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटही झाली तर इकडे अनिल परब म्हाडाच्या कार्यालयात गेले, त्याचवेळी शिवसैनिकांना ठिय्या आंदोलनाचं आवाहनही केलं गेले.
किरीट सोमय्या कोणत्या अधिकारानं पाडकाम पाहण्यासाठी येतात, याचा जाब विचारण्यासाठी अनिल परब म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या भेटीला गेले होते. इकडे ठिय्या आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते तर शिवसैनिकांचं म्हाडाच्या गेटसमोरचं आंदोलन गुंडाळलं होतं.
अनिल परब जवळपास 4 तास म्हाडाच्या कार्यालयात होते त्या 4 तासांनंतर ते म्हाडाचच पत्र घेऊन बाहेर आले आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसह सोमय्यांवर तुटून पडले.
यावेळी अनिल परब यांचा आणि त्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामाचा काहीही संबंध नाही, असं म्हाडाचाच पत्र अनिल परब यांनी दाखवले, आणि म्हाडावरच हक्कभंगाचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्या अनिल परब यांच्या कार्यालयावरुन राडा झाला आहे ते प्रकरण आहे वांद्र्यातील म्हाडाच्या सोसायटीत अनिल परब यांचे संपर्क कार्यालय होतं. मात्र त्याचे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. हायकोर्टानंही कार्यालय नियमित करण्यासाठी अर्ज करण्यास सांगितला होता.
पण म्हाडानं कार्यालय नियमित करण्याचा अर्ज फेटाळला आणि किरीट सोमय्यांच्या दबावामुळंच अर्ज फेटाळल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तसंच म्हाडाच्या सोसायटीतलं कार्यालय माझं नसल्याचं परब यांचे म्हणणे आहे. तर रहिवाशांच्या परवानगीनं ते कार्यालय सुरु होतं असंही परब यांनी सांगितले आहे.
किरीट सोमय्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या मागे लागले आहेत. आता त्यांनी परबांना ईडीच्या कारवाईचाही इशारा दिला आहे. त्यावरुन परबांनीही सोमय्यांना सवाल केले आहेत आतापर्यंत सोमय्यांनी आरोप झालेल्या नेत्यांचं काय केले ?असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.
तर कार्यालय तुटल्यानंतर अनिल परब यांनी राणे यांच्या बंगल्यावरुन सोमय्यांना टोला लगावला आहे. राणे यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम पाहण्यासाठी सोमय्या सोबत येणार का ? असा खोचक सवाल परब यांनी केला आहे.
त्यानंतर अनिल परब आणि किरीट सोमय्यांच्या वादात, आमदार रवी राणांनीही उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नव्या इमारतीतही अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.