“केंद्रीय मंत्र्यांची जर ही अवस्था असेल तर आम्हा खासदारांचं काय होईल”; खासदारांच्या बैठकीतील चर्चेवर या नेत्याची टीका
आपलं रडगाणं या बैठकीत गात होते आमचीच काम अजून रखडलेली आहेत असं केंद्रीय मंत्री सांगत होते. त्यामुळे आमच्यासारख्या खासदारांनी मग काय करायचे असा सवालच जलील यांनी उपस्थित केले.
मुंबईः केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार असल्याने त्या धर्तीवर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याव बैठकीला एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हेही देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी बैठकीतील मुद्यावर चर्चा करताना सांगितले की, केंद्रीय मंत्रीच या बैठकीमध्ये आपलं रडगाणं गाते होते अशी टीका या बैठकीवर त्यांनी केली. जर केंद्रीय मंत्र्याची ही अवस्था असेल तर आम्हा खासदारांचे काय होईल असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.
खासदारांच्या बैठकीविषयी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळे विषय मुद्दे संसदेत मांडण्यात यावेत यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
त्यावेळी अनेक सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्यातील वेगवेगळ्या समस्या आणि लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील प्रश्नही मांडण्यात आले.
महाराष्ट्रातील 8 मंत्री केंद्रात आहेत तर या 8 मंत्र्यांनी जर एकत्र येऊन कोणतेही विषय लावून धरले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल अशादेखील सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. मात्र या बैठकीत केंद्रात मंत्री असणारे नेतेच आपलं रडगाणे गात होते.
आपलं रडगाणं या बैठकीत गात होते आमचीच काम अजून रखडलेली आहेत असं केंद्रीय मंत्री सांगत होते. त्यामुळे आमच्यासारख्या खासदारांनी मग काय करायचे असा सवालच जलील यांनी उपस्थित केले.
दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
त्याविषयी विचारले असता इम्तियाज जलील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा हा डाव आहे आणि हे सरकारने ओळखलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तेलंगणाचा नेता महाराष्ट्रात येऊन भडकाऊ भाषण करत असेल आणि महाराष्ट्रात अशांतता निर्माण करत असेल तर यावर राज्य सरकारने विचार करायला हवा असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. त्या भजकाऊ भाषणाबद्दल बोलता त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे.
महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा सुपारी दिली गेली आहे का याचा देखील विचार केला जावा अशी सूचना त्यांनी यावेळी मांडली आहे.
जर आमच्याविषयी घाणेरड्या भाषेत बोलत असतील तर आम्हीदेखील शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.