“हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत”, सरकारवर सडकून टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन माणसं आणावी लागत नाहीत, सरकारवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 11:52 PM

मुंबईः सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून मुंबईत 17 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावरून सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सरकारविरोधात हा महामोर्चा काढला जात असला तरी हा महामोर्चा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, मिंधे सरकारला भाणावर आणण्यासाठी, आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी, अखंड महाराष्ट्रासाठी आणि युवकांचा रोजगार टिकवण्यासाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.

या महामोर्चावरून राष्ट्रवादीचे आमदा जितेंद्र आव्हाड आणि नेत्या रुपाली पाटील ठोंबर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते.

त्यासाठी महामंडळाकडे बसची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोलिसांची एनओसी मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

याआधी कधीही एनओसीची मागणी करण्यात आली नव्हती मात्र आता महामोर्चा काढणार म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडवणूक केली जात आहे.

तसेच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सरकारवर टीका करताना शिंदे गटासारखं इव्हेट करुन माणसं आणावी लागत नाहीत तर ती उत्स्फूर्तपणे महामोर्चाला येणार आहेत असंही त्यांनी सांगितले. पुण्यापेक्षा महामोर्चा मुंबईत असणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

सध्या राज्यात अनेक समस्या आहेत. तरीही राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न केले जात नाहीत. रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा समस्या असतानाही लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाही ते विषय काढून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.