पनवेलकरांनो सावधान, ब्लॉकमुळे हार्बरची सीएसएमटी-पनवेल शेवटची लोकल रात्री 10.58 वा. सुटणार
हार्बरमार्गावरुन रात्रीचा प्रवास करणाऱ्या 2 ऑक्टोबरपर्यंत त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पनवेल स्थानकातील डीएफसी ब्लॉकमुळे 11 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत शेवटची पनवेल लोकल रा. 10.58 वा. सुटणार आहे.
मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात पश्चिम डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी येत्या 2 ऑक्टोबरपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती ब्लॉकच्या अमलबजावणीमुळे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकलच्या वाहतूकीत काही बदल केले आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी स्थानकातून पनवेलकरिता शेवटची लोकल रात्री 10.58 वाजता सुटणार आहे. तसेच अनेक पनवेल लोकलचा प्रवास बेलापुरपर्यंतच होणार असून तेथूनच त्या पुन्हा सीएसएमटीसाठी रवाना करण्यात येणार आहेत.
पनवेल स्थानकात पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या मालगाडीच्या मार्गाचे कामकरण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. मालवाहतुकीला चालना देण्यासाठी दादरी ते जेएनपीटीदरम्यान पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे ( मालगाडीची स्वतंत्र मार्गिका ) काम करण्यात येत आहे. या कॉरिडॉरकरिता पनवेल यार्डमध्ये दोन रेल्वे मार्ग बांधण्यात येत आहेत. 18 ऑगस्टपासून या मार्गाचे काम सुरु झाले आहे. हे काम येत्या 2 ऑक्टोबरपर्यत पूर्ण करण्याची योजना आहे. त्यासाठी सोमवार दि. 11 सप्टेंबरपासून रात्री 12.30 ते पहाटे 5.30 असे नाईट ब्लॉकमध्ये काम करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
————- सीएसएमटी-पनवेल शेवटची लोकल रात्री 10.58 वाजता
सीएसएमटी-पनवेल पहिली लोकल पहाटे 4.32 वाजता
सीएसएमटी-पनवेल रा. 11.14 वा., रा. 12.24 ,पहाटे 5.18 वा., सकाळी 6.40 वा. या लोकल रद्द
सीएसएमटी-पनवेल रा. 11.30 वा.,रा. 11.52 वा., रा. 12.13वा., रा.12.40 वा. या लोकल बेलापूरपर्यत धावतील आणि तेथूनच पुन्हा सीएसएमटीकडे रवाना होतील.
वडाळा-बेलापुर रात्री 12.50 ची लोकल वाशीपर्यत धावणार
—
पनवेल-सीएसएमटी अप मार्ग
पनवेल-सीएसएमटी रा. 9.52 वा. ,रा.10.58 वा., पहाटे 4.03 वा.,पहाटे 5.31 वा. या लोकल रद्द
पनवेल स्थानकातून सीएसएमटीसाठी पहिली लोकल पहाटे 5.40 वाजता
—————
ठाणे -पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्ग
ठाणे-पनवेल शेवटची लोकल रात्री 11.32 वाजता
ठाणे-पनवेल पहिली लोकल सकाळी 6.20 वाजता
ठाणे-पनवेल-नेरुळ रात्री 9.36 वा., रा. 12.05 वा.,पहाटे 5.12 वा., 5.40 वा. या लोकल रद्द
—-
पनवेल ते ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्ग
पनवेल ते ठाणे शेवटची लोकल रात्री 10.15 वाजता
पनवेल ते ठाणे पहिली लोकल पहाटे 6.13 वाजता.
पनवेल ते ठाणे रा.11.18 वा.,पहाटे 4.33 वा., पहाटे 4.53वा. या लोकल रद्द