Kalyan Sadakpada: अल्पवयीन मुलांकडून करायचा महागड्या सायकलची चोरी, सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू करत एका उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिम येथील गुरुदेव हॉटेल येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच सुरक्षा रक्षकाने सर्व प्रकरण इतंभूत सांगितले.

Kalyan Sadakpada: अल्पवयीन मुलांकडून करायचा महागड्या सायकलची चोरी, सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला अटक
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 1:22 PM

मुंबई, कल्याण शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या सायकल चोरीच्या (Cycle thief in kalyan) गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी लाखडकपाडा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षारक्षकासह (Security guard arrested) सोसायटीतीलच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान या त्रिकूटाने चोरलेल्या एक लाख 27 हजार रुपये किमतीच्या 14 सायकली पोलिसांनी जप्त केल्या. सुरक्षा रक्षक  मुलांना पैशाचे आमिष दाखवत सायकल चोरी करायला लावायचा. त्यानंतर चोरी केलेल्या सायकल तो कमी दारात बाहेर विकायचा. सॅड्रीक एबीनिझर असे आरोपीचे नाव आहे.

सायकल चोरी संदर्भात तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल होताच कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी तपास सुरु केला.  सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू करत एका उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिम येथील गुरुदेव हॉटेल येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच सुरक्षा रक्षकाने सर्व प्रकरण इतंभूत सांगितले.

दोन अल्पवयीन मुलांकडून परिसरातील महागड्या सायकली चोरून विकत असल्याची कबुली सॅड्रीक एबीनिझर याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून  1 लाख 27 हजार किंमतीच्या 14 सायकली हस्तगत केल्या आहे. सध्या या आरोपीचा अजून कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास पोलिस करत असून या प्रकारे त्यांनी किती गुन्हे केलेत याचाही तपास खडकपाडा पोलीस करत आहे.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.