अंधेरीत बाराव्या मजल्यावरील भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू
सुमीत सावंत, टीव्ही9 मराठी, मुंबई : सिलेंडरच्या स्फोटामुळे मंगळवारी रात्री मुंबईतील अंधेरी येथील 21 मजली इमारतीत आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. विरा देसाई मार्गावर असलेल्या कदम चाळीच्या एसआरए इमारतीच्या दहाव्यामजल्यावर ही आग लागली होती. सात वर्षाच्या सागर शैलेश शर्मा आणि विकी लालकृष्ण शर्मा यांचा या आगीत मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर […]
सुमीत सावंत, टीव्ही9 मराठी, मुंबई : सिलेंडरच्या स्फोटामुळे मंगळवारी रात्री मुंबईतील अंधेरी येथील 21 मजली इमारतीत आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. विरा देसाई मार्गावर असलेल्या कदम चाळीच्या एसआरए इमारतीच्या दहाव्यामजल्यावर ही आग लागली होती. सात वर्षाच्या सागर शैलेश शर्मा आणि विकी लालकृष्ण शर्मा यांचा या आगीत मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
विरा देसाई मार्गावरील 21 मजली एसआरए इमारतीमध्ये दहाव्या मजल्यावरील 1001 रुममध्ये ही आग लागली होती. संध्याकाळी घरात छट पूजेच्या निमित्ताने तयारी सुरु होती. याच दरम्यान आवरा आवर करत असताना घरातील गॅस सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि मोठी आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग दहाव्या मजल्यावरुन अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग लागल्यामुळे घरातील दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर तीन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं
मुंबईत आगीचं सत्र अजूनही सुरु असल्याचे दिसत आहे. याआधीही मुंबईत अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीमध्येही मुंबईत फटाक्यांमुळे बऱ्याच ठिकाणी आग लागली होती. ऑगस्ट महिन्यातही अशीच घटना दादर येथील इमारतीमध्ये घडली होती. 12 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 21 जणांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढलं होतं.