25 हजार पुलाव पॅकेट, केळी, डाळ आणि चपाती, शेतकरी मोर्चासाठी दादरच्या गुरुद्वाराची शिदोरी

हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या जेवणासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. (Dadar Gurudwara farmers protest)

25 हजार पुलाव पॅकेट, केळी, डाळ आणि चपाती, शेतकरी मोर्चासाठी दादरच्या गुरुद्वाराची शिदोरी
आझाद मैदानावर अशा प्रकारे फूड पॅकेट दिले जात आहेत.
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 12:45 PM

मुंबई : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आज (25 जानेवारी) शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दाखल झाले आहेत. तसेच, सत्ताधारी महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिल्यामुळे आजच्या आंदोलनाला विशेष महत्त्व आले आहे. हजारोंच्या संख्येने जमलेल्या या आंदोलक शेतकऱ्यांच्या जेवणासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. दादरच्या गुरुद्वाराने (Dadar Gurudwara) येथील शेतकऱ्यांना तब्बल 25 हजार पुलावचे पॅकेट, केळी, डाळ-चपातीची सोय केली आहे. शेतकऱ्यांसाठी आमची ही शिदोरी असल्याची भावाना गुरुद्वाराच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. (Dadar Gurudwara provided 25,000 packets of meal to the farmers)

राज्यभरातून शेतकरी जमत असल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर मोठी गर्दी झाली आहे. यावेळी त्यांच्या जेवणाची, पाण्याची सोय करणे आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे. मात्र, या आंदोलक शेतकऱ्यांच्या अन्नाची सोय करण्यासाठी विविध सामाजिक संघटना हिरिरिने समोर येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंघसभा गुरुद्वारातर्फे सुमारे 25 हजार फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये पुलाव, कुरकुरे, यांचा समावेश आहे. तसेच, या गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणाचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणात केळी, डाळ-चपातीचे वाटप केले जाणार आहे. या अन्नवाटपाबाबत बोलताना ही व्यवस्था बघत असलेल्या दळजित सिंग यांनी कृतज्ञ झाल्याची भावना व्यक्त केलीये.

एकनाथ शिंदेंकडून अन्नवाटप

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अनेक संगठना तसेच राजकीय नेते, मंत्र्यांकडून जेवण आणि पाणी पुरवलं जात आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जेवण तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी जेवणाचे सुमारे 10 हजार पॅकेट आणले आहेत. तसेच, कितीजरी शेतकरी वाढले तरी सर्वांना अन्न पुरवू असं एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या 

>>> केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत,

>>> शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा

>>> महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात महात्मा फुले कर्ज माफी योजना स्थगित केली होती. ही योजना पुन्हा सुरू करावी

>>> वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी

आंदोलनात महाविकास आघाडीची उडी

दरम्यान, आजच्या आंदोलनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने उडी घेतली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनला जाहीर पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी होतील. पर्यटनंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा सरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या मोर्चात सामील होणार आहेत. आजच्या आंदोलनात या बड्या नेत्यांचा सहभाग होणार असल्यामुळे आजच्या आंदोलनाला विेशेष महत्त्व आले आहे.

संबंधित बातम्या :

पवार-ठाकरे मैदानात, थोरातही सोबतीला, शेतकरी आंदोलनात सर्वात मोठे चेहरे

(Dadar Gurudwara provided 25,000 packets of meal to the farmers)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.