Train Accident: दादर स्टेशनबाहेर गदग-पद्दुचेरी एक्सप्रेसची धडक; एकाच रुळावरुन जात असल्याने अपघात

एक्स्प्रेस दादर-पद्दुचेरी आणि गदग एक्सप्रेस या दोन्ही गाड्या आदळल्याने मध्य रेल्वेची सगळी वाहतून खोळंबली होती.  घटना घडल्यानंतर काही वेळातच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरु करण्यात आले.

Train Accident: दादर स्टेशनबाहेर गदग-पद्दुचेरी एक्सप्रेसची धडक; एकाच रुळावरुन जात असल्याने अपघात
दादर स्टेशनजवळ दोन एक्सप्रेस एकमेकांवर आदळल्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 3:16 PM

मुंबई : दादर रेल्वे स्टेशनबाहेर (Dadar Railway Satation) दोन एक्सप्रेस एकाच ट्रॅक जात असल्याने दोन रेल्वे धडकून रेल्वेच तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रेल्वेचे मात्र नुकसान झाले आहे. गदग एक्सप्रेस (Gadag Express) आणि् दादर पद्दुचेरी (Dadar Paducheri) या दोन्ही रेल्वे दादरवरुन निघाल्यानंतर माटुंगा स्टेशनकडे जाताना एकाच ट्रॅकवर जात एकमेकींना आदळल्या. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली.  यामध्ये डब्यांचे नुकसान होऊन तीन डबे रुळावरुन घसरेल आहे. दोन्ही रेल्वेंची धडक झाल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या रेल्वेंची धडक झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांनी रेल्वेतून उतरुन माटुंगा टेशनकडे चालत जावे लागले. यानंतर रेल्वेच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेल्वे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची विचारपूस केली. या वेळी रेल्वेतील साहित्य उतरवण्यासाठीही त्यांच्याकडून मदत करण्यात आली आहे.

एक्स्प्रेस दादर-पद्दुचेरी आणि गदग एक्सप्रेस या दोन्ही गाड्या आदळल्याने मध्य रेल्वेची सगळी वाहतून खोळंबली होती.  घटना घडल्यानंतर काही वेळातच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरु करण्यात आले. प्रवाशांचे साहित्य रेल्वेतून उतरवण्यात आले. काही प्रवाशी लांब जाणारे असल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सगळे प्रवासे घाबरले होते.

टीव्ही9 मराठीचे सौरव महाजन हेही याच ट्रेनने कल्याणला जात होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, दादर स्टेशनवरु निघाल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर मोठ्याने आवाज आणि शार्टसर्किट झाल्याचा आवाज झाला. त्या दोन्ही आवाजाने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर तात्काळ प्रवासी रेल्वेतून उतरले. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली तरी रेल्वेचे मात्र नुकसान झाले आहे.

दोन्ही रेल्वेंची धडक होऊन झालेल्या अपघातामुळे रेल्वेच्या इंजिनचे आणि तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. धडक बसल्याने रेल्वेचे डबे फाटले असून रेल्वे रुळावरुनही घसरली आहे.

अपघातानंतर प्रवाशांनी उतरुन स्टेशनच्या मार्गाने चालू लागले. त्यावेळी लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा प्रचंड त्रास झाला. घटनास्थळी तात्काळ रेल्वे पोलीस दाखल झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांनाही मदत करण्यास सुरुवात केली गेली. यावेळी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी या घटनेची माहिती ही दुर्घटना कशामुळे घडली त्याचा तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित बातम्या

Nagpur Crime : नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

Dadar Railway Accident : दादर रेल्वे स्टेशनजवळ दोन एक्सप्रेस एकमेकांवर आदळल्या, शॉट सर्किट आणि प्रवाशांमध्ये भीती

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या अडचणी कमी होईना! मुंबई, अकोला, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.