दादर स्टेशनबाहेरच्या हनुमान मंदिराचा इतिहास काय? 80 वर्षापूर्वी झाडाखाली काय घडलं? विश्वस्ताने सांगितला अज्ञात इतिहास

हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांच्याशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला. यावेळी प्रकाश कारखानीस यांनी हनुमान मंदिराचा इतिहास सांगितला आहे. 80 वर्षापूर्वी झाडाखाली काय घडलं? याबद्दलही त्यांनी भाष्य केले.

दादर स्टेशनबाहेरच्या हनुमान मंदिराचा इतिहास काय? 80 वर्षापूर्वी झाडाखाली काय घडलं? विश्वस्ताने सांगितला अज्ञात इतिहास
दादर हनुमान मंदिर
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 1:36 PM

Prakash Karkhanis Hanuman Temple History : दादर परिसरात असलेले 80 वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे. 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. आता यावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आता या मंदिराच्या विश्वस्तांनी या हनुमान मंदिराचा इतिहास सांगितला आहे.

हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांच्याशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला. यावेळी प्रकाश कारखानीस यांनी हनुमान मंदिराचा इतिहास सांगितला आहे. 80 वर्षापूर्वी झाडाखाली काय घडलं? याबद्दलही त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी आम्ही याबद्दलच्या कायदेशीर बाबी नंतर पाहू. पण त्याआधी हिंदू म्हणून या मंदिराला वाचवण्याचा प्रयत्न करु, असे प्रकाश कारखानीस यांनी म्हटले.

हे मंदिर या ठिकाणी असलेल्या हमालांचे

“दादरमधील हे मंदिर कित्येक वर्षांपासून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवा केली जाते. हे मंदिर दादर रेल्वे स्थानक होण्याच्या आधीपासून या परिसरात आहे. हे हनुमानाचे मंदिर या ठिकाणी असलेल्या हमालांचे आहे. आम्हाला या ठिकाणी एका झाडाखाली ही मूर्ती मिळाली होती. त्यानंतर त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं. गेल्या ८० वर्षांपासून या भागात हे मंदिर आहे”, असे प्रकाश कारखानीस यांनी सांगितले.

“या हनुमान मंदिराला नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु आम्ही कायदेशीर बाबी नंतर पाहू. त्याआधी हिंदू म्हणून या मंदिराला वाचवण्याचा प्रयत्न करु. अनेक लोक यामध्ये आता राजकीय बोलत आहेत. परंतु राजकीय न पाहता एक हिंदू म्हणून या ठिकाणी हे मंदिर वाचवण्यासाठी जे कोणी येत असतील त्यांचा मी स्वागत करतो”, असेही प्रकाश कारखानीस यांनी म्हटले.

“आता सर्व राजकीय नेते पोळ्या भाजायला येतात”

“आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही हे पुरावे पुढे आणू. परंतु या मंदिराला कोणीही हात लावू शकत नाही. जर या मंदिराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही याचा विरोध करु. याआधी नोटीस आली होती, तेव्हा राहुल शेवाळे, स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी हस्तक्षेप करून ही नोटीस थांबवली होती. पण आता सर्व राजकीय नेते पोळ्या भाजायला येत आहेत. स्थानिक आमदार पण आता फिरकलेत. हे हिंदुत्व हिंदुत्व करतात ना तर त्यांनी येऊन मंदिर वाचवावं. आतापर्यंत आमचं घर वातावरण म्हणून आम्ही मंदिरात देवाकडे येत होतो. पण आता देवच बघेल स्वतःचं घर वाचवायचा आहे”, असेही प्रकाश कारखानीस म्हणाले.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.