Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत भीषण अपघात, कार एकमेकांवर आदळल्या; दोघांचा मृत्यू

मुंबईतील दादर परिसरात आज एक भीषण कार अपघात झाला. सेनापती बापट मार्गावर एका एसयूव्हीने टॅक्सीला धडक दिली, ज्यामुळे टॅक्सी चालक आणि एक महिला यांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबईत भीषण अपघात, कार एकमेकांवर आदळल्या; दोघांचा मृत्यू
mumbai accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 4:44 PM

मुंबईतील दादर परिसरात दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टॅक्सी चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दादरच्या सेनापती बापट मार्गावर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे

नेमकं काय घडलं?

आज शनिवारी (२९ मार्च) दुपारी १२ च्या सुमारास लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार एका भरधाव एसयूव्ही कारने समोरुन टॅक्सीला धडक दिली. ही धडक इदतकी भीषण होते की यात टॅक्सीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातामुळे टॅक्सीतील दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या अपघातामुळे मुंबईकरांना धक्का बसला आहे.

लोअर परळच्या एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नाही. तसेच या परिसरात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. यामुळे या ठिकाणच्या वाहनांची संख्या ही खूप जास्त आहे. तसेच या वाहनांचा वेगही जास्त असतो. लाखो कर्मचारी या पुलाचा वापर करत असतात. पण आज शनिवार असल्याने नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती. तसेच रस्ताही मोकळा होता. या मोकळ्या रस्त्यावरुन वेगाने आलेल्या कार आणि टॅक्सीची धडक झाली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

कोकणात तीन अपघात

तर दुसरीकडे कोकणात तीन ठिकाणी अपघात झाले. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहेत. अलिबाग बायपास जवळ असेलल्या चर्चजवळ भीषण अपघात झाला. यात मोटारसायकल आणि स्कुटीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे भागातील हॉटेल विरंगुळा येथे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक दिली. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कार ने दुचाकीला धडक देत मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो पीक अप गाडीवर आदळली. अपघातामध्ये  दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. यात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील 35 प्रवासी जखमी झाले. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे. एसटी चालकाच्या छातीला तर वाहकाच्या डोक्याला दुखापत झाली.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.