मुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohanbhai Sanjibhai Delkar) मुंबईत मृतावस्थेत आढळले. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला. डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. (Dadra and Nagar Haveli MP Mohanbhai Sanjibhai Delkar found dead at Mumbai Hotel)
मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोहन डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मोहन डेलकर हे सातवेळा खासदार राहिले आहेत.
कोण होते मोहन डेलकर?
58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.
कोण होते खासदार मोहन डेलकर?
मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते
डेलकर यांची कारकीर्द कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झाली
आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला
1985 मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना सुरु केली.
(Dadra and Nagar Haveli MP Mohanbhai Sanjibhai Delkar found dead at Mumbai Hotel)
1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात विजय मिळवला होता.
मग ते 1991 ते 1996 दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं.
मग 1998 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, त्यांच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली.
त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.
मग 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.
4 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला
मग 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन, अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
2020 मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ
(Dadra and Nagar Haveli MP Mohanbhai Sanjibhai Delkar found dead at Mumbai Hotel)