weather forecast | मुंबईत पारा 17 अंशावर, माथेरानमध्ये मुंबईपेक्षा अधिक थंडी

मुंबईचे तापमान किमान तापमान 17 अंशावर पोहोचले असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आहे.

weather forecast | मुंबईत पारा 17 अंशावर, माथेरानमध्ये मुंबईपेक्षा अधिक थंडी
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 9:14 AM

मुंबई : राज्यात गारवा वाढला असून राजधानी मुंबईतही (mumbai weather report) पारा घसरु लागला आहे. मुंबई हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार (30 डिसेंबर) मुंबईचे किमान तापमान 17 अंशावर पोहोचले असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आहे. कालच्या तुलनेत आजच्या तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे. काल (29 डिसेंबर) चालू हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. तसेच माथेरानमध्ये मुंबईपेक्षा अधिक थंडी असून तेथे पारा आणखी घसरलेला आहे.  (daily update of mumbai weather report today)

राज्यात गारवा वाढला आहे. गुजरात, पंजाब, हरियाणासारख्या राज्यांमध्येही पारा सातत्याने घसरताना दिसत आहे. राज्यातील मुंबईमध्येदेखील तापमान 15 ते 20 अंशादरम्यान नोंदवले जात आहे. काल मुंबईमध्ये किमान तापमान 15 अंशापर्यंत आले होते. तर आज पारा 2 अंशांनी वाढला असून सध्या किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर आहे. तर कमाल तपामानन 31 अंश सेल्सिअसवर आहे. दरम्यान, घसरलेल्या तापमानामुळे रात्री, पहाटे आणि दुपारीही शहरातील वातावरणात गारवा जाणवत आहे. मुंबई शहरापेक्षा माथेरानमध्ये तापमान कमी आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्यांमुळे तापमानात ही घसरण झाली आहे.

कोणत्या शहरात किती तापमान ? (अंश सेल्सिअसमध्ये)

       शहर                  किमान        कमाल

  • औरंगाबाद              10             28
  • बुलडाणा                12              27
  • परभणी                  12             30
  • नाशिक                  10             29
  • अमरावती              14             28
  • सोलापूर                 15             32
  • पुणे                        13             31

दरम्यान, आगामी दिवसांत राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईमध्ये उबादार कपड्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत आहे. तसेच, यावेळी नववर्षाच्या सुरवातीपासून पारा आणखी घसरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईसह उपनगरात पारा घसरला, किमान तापमान 14 अंशावर

नारायण राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही, भाजपचं सरकार आलं नाही म्हणून तडफड : एकनाथ गायकवाड

‘काही जणांना जास्त बोललं की आपलं महत्त्व वाढेल असं वाटतं’, नवाब मलिकांचा नसीम खान यांना टोला

(daily update of mumbai weather report today)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.