परीक्षा घोटाळ्यामध्ये सरकार दलालांना पाठिशी घालतंय; मलिकांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही – दरेकर

| Updated on: Dec 22, 2021 | 3:27 PM

आरोग्य पदाची भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षेमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये असतानाही तिला पात्र ठरवून परीक्षेचे काम कसे काय देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

परीक्षा घोटाळ्यामध्ये सरकार दलालांना पाठिशी घालतंय; मलिकांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - दरेकर
प्रवीण दरेकर, भाजप नेते
Follow us on

मुंबई: आरोग्य पदाची भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षेमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये असतानाही तिला पात्र ठरवून परीक्षेचे काम कसे काय देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकार परीक्षा भरती प्रकरणामध्ये दलालांना पाठिशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोपीही त्यांनी केला. परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून, त्याचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

वीजबिलावरून टीका

दरम्यान यावेळी त्यांनी वीजबिल वसुलीवरून देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एकीकडे अतिवृष्टी, दुष्काळ, कोरोनामुळे शेतकरी हैराण आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. जे शेतकरी वीजबिल भरत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीजपुरवठा खंडित केला तर त्यांनी पिकांना पाणी कसे द्यायचे असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. एकतर अनेक शेतकऱ्यांना चुकीची आणि भरमसाठ रकमेची वीजबिले देण्यात आली, वरून दुसरीकडे त्या बिलांमध्ये सुधारणा देखील केली जात नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

नवाब मलिकांना टोला 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देखील दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. मलिकांसारख्या खोट्या मानसाकडून मला कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मी मलिक यांच्यावर या आधीच दावा ठोकल्याचे ते म्हणाले. जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. आपले सरकार कधीही कोसळू शकते, अशी भिती महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकपक्षला वाटत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

जनता खड्ड्यात राजा गुळगुळीत रस्त्यांवर; सर्व सामान्यांना न्याय कधी मिळणार?, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Congress | नागपूरचे छोटू भोयर प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे; आपसातील वाद कसे मिटणार?

Sanjay Raut on UP election| उत्तर प्रदेशातून गंगा उलटी वाहणार…शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करली तसेच मिश्रांबाबत होणार, राऊतांचा घणाघात…